
सोलापूर : सोलापूर, धाराशिव आणि पुणे अशा तीन जिल्ह्यात १५ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे (वय ४२, रा. भारनिमगाव, इंदापूर) याला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख सहा हजार रुपयांचे दागिने व एक लाख ८३ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.