लहान मुलाच्या अपहरणप्रकरणी संशयितास चार दिवसांची कोठडी; वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gunhe Vrutt

बसवेश्‍वर नगरातील सागर कृष्णप्पा गायकवाड याने त्या परिसरातील मंदिरासमोर खेळणाऱ्या यश कोळी याला उसाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर सागरने यशच्या वडिलांना पाच लाख रुपये द्या, मुलाला सुरक्षितपणे सोडतो, अशी धमकी दिली. दरम्यान, पोलिसांनी 18 तासांत घटनेचा तपास करून यशला शोधून काढले.

लहान मुलाच्या अपहरणप्रकरणी संशयितास चार दिवसांची कोठडी; वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : बसवेश्‍वर नगरातील सागर कृष्णप्पा गायकवाड याने त्या परिसरातील मंदिरासमोर खेळणाऱ्या यश कोळी याला उसाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर सागरने यशच्या वडिलांना पाच लाख रुपये द्या, मुलाला सुरक्षितपणे सोडतो, अशी धमकी दिली. दरम्यान, पोलिसांनी 18 तासांत घटनेचा तपास करून यशला शोधून काढले. संशयित आरोपी सागरला पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केले. त्या वेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची (14 नोव्हेंबरपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. जाधव यांनी तर संशयित आरोपीतर्फे ऍड. अभिषेक गुंड यांनी काम पाहिले. 

दरवाजा तोडून अडीच लाखांचा मुद्देमाल चोरी 
घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करून घरातील दोन लाख 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यात चार हजार रुपयांचा मोबाईल आणि दोन लाख 51 हजार 500 रुपयांचे दागिने होते, अशी फिर्याद मोहम्मद हानिफ अब्दुल कुरेशी (रा. आफना अपार्टमेंट, पाचवा मजला, न्यू पाच्छा पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर करीत आहेत. 

दुचाकी चोरास पकडले 
सोलापूर, 11 : सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरीस गेल्या होत्या. त्यानंतर संबंधितांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुचाकी चोरास पकडले आणि त्याच्याकडील दुचाकीही जप्त केल्या. तडकल (कलबुर्गी) येथील अजय सिद्राम चौगुले (सध्या रा. रेल्वे स्टेशन परिसर) याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलिस हवालदार ओमप्रकाश मडवळ, खाजप्पा आरेनवरु, वाहब शेख, सागर सरपती, कृष्णा बडुरे, विठ्ठल जाधव, राहुल आवारे, नितीन गायकवाड, राम भिंगारे, सचिन गुजरे, विठ्ठल काळजे यांच्या पथकाने केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top