पापरी व खंडाळी येथे दिवसा ढवळया घरफोड्या ,रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news house burglaries cash gold stolen solapur

पापरी व खंडाळी येथे दिवसा ढवळया घरफोड्या ,रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

मोहोळ : बंद घराच्या दरवाज्याची कुलपे तोडून, आतील कपाटाची कुलपे तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे साडेसहा लाख रुपयाच्या दोन घरफोड्या बुधवार ता 20 रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास खंडाळी व पापरी या दोन ठिकाणी झाल्या. दिवसा ढवळ्या झलेल्या या घटना मुळे नागरिकात घबराट पसरली आहे. पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार ,पहिली घटना खंडाळी ता मोहोळ येथे घडली. इंगोले वस्ती परिसरात राहणारे उत्तम रघुनाथ मुळे हे दुपारी जेवण करून घराला कुलूप लावून शेताकडे मोटार चालू करण्यासाठी गेले होते. दरम्यान मोटारीची फ्युज गेल्याने उत्तम यांचा मुलगा फ्युज वायर नेण्यासाठी घराकडे आला. त्यावेळी त्याला घराचे दार उघडे दिसले.

त्यांने वडिलांना बोलावले व पाहिला प्रकार सांगितला. वडिलांनी घरात जाऊन पाहिले असता कांदा व कोबी हा शेतातील माल विकून आलेले पाच लाख रुपयाची रक्कम घरात होती. चोरट्याने घरातील तीन कपाटांची कुलपे तोडून आतील रोख रक्कम सोन्याची चेन व दोन अंगठ्या असा सुमारे सहा लाखाचा ऐवज चोरून नेला. दुसरी घटना पापरी ता मोहोळ येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पापरी-पेनुर रस्त्यालगत संतोष दत्तात्रय हैदळे यांची वस्ती आहे. त्यांची पत्नी ही घराला कुलूप लावून शेतीच्या कामाला गेली होती. अज्ञात चोरट्याने बंद घराचा कोंयंडा उचकटून, कुलूप मोडून आतील रोख रक्कम व सोने असा सुमारे 40 हजाराचा ऐवज लंपास केला.

या दोन्ही घटनेची माहिती समजतात उपविभागीय अधिकारी अमोल भारती, पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेटी देऊन पाहणी केली. पापरी येथे पापरी पेनुर रस्त्या लगत असलेल्या मराठी शाळेचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ही तपासले. दरम्यान पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. खंडाळी येथील उत्तम मुळे यांची ज्या ठिकाणी चोरी झाली आहे ते ठिकाण श्वानाने हुंगले व आष्टी तलावाकडील बाजूस गेले. संतोष हैदळे यांचीही ज्या ठिकाणी चोरी झाली ते ही ठिकाण श्वानाने हुंगुन पेनुर रस्त्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी घुटमळले. दोन्ही चोऱ्या दिवसा ढवळा झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकात घबराट पसरली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्या पासून सर्वात जास्त चोऱ्या शेटफळ बीटमध्ये झाल्या आहेत. रात्री उशिरा पर्यंत या घटनेच्या नोंदी करण्याचे पोलिसांचे काम सुरू होते.

Web Title: Crime News House Burglaries Cash Gold Stolen Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..