पेट्रोल पंपावर दगडफेक ! वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त

सोलापूर शहर व परिसरातील गुन्हेगारी वृत्त
Crime
CrimeEsakal

सोलापूर : कुंभारी रोडवरील गुरुकृपा पेट्रोल पंपावर (Petro Pump) किरकोळ कारणातून जमाव जमवून दगडफेक केल्याप्रकरणी मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील (रा. नवनाथ नगर, एमआयडीसी रोड) यांनी एमआयडीसी पोलिसांत (MIDC Police) फिर्याद दिली. त्यानुसार विशाल राजू गोखले, आनंद महादेव विटकर (रा. मद्दा झोपडपट्टी, साई बाबा चौक), राजेश कृष्णहरी उषाकोयल (रा. सुनील नगर, एमआयडीसी), पवन लक्ष्मीनारायण पुल्ली (रा. अशोक चौक), सागर प्रकाश शिंदे (रा. मोतीलाल नगर, साई बाबा चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींनी पेट्रोल पंपासमोर दुचाकी का लावली, असे विचारल्यानंतर पाटील व त्यांचे मॅनेजर शाहीर गुंदर यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून पंपावर दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक माळी हे पुढील तपास करीत आहेत. (Crime news in and around Solapur city)

Crime
कोरोना ड्यूटी नाकारणारे शिक्षक बिनपगारी !

मास्कविना फिरणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही बेशिस्तपणे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या शहरात लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत विनामास्क फिरणाऱ्या 390 जणांकडून एक लाख 95 हजारांचा दंड वसूल केला. तर तीन दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्याकडूनही पोलिसांनी 22 हजारांचा दंड वसूल केला. तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 315 जणांना 71 हजार 200 रुपयांचा दंड केला असून 44 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Crime
अकरावी प्रवेशासाठी सीईटी ! शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र समिती

कोयत्याने वार केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. लष्कर परिसरातील बेडर पूल (रामशा दवाखान्याशेजारी) ही घटना घडली असून, राजेश गुलजार चौधरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून विजू फटफटवाले, सागर फटफटवाले, सुनीता फटफटवाले, अर्जुन फटफटवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपींनी संगनमत करून चौधरी व त्यांचा भाऊ रवी चौधरी या दोघांच्या उजव्या हातावर कोयत्याने वार करून त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जखमी केले. राधा आंबेवाले व विकी यांनाही यावेळी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पोलिस नाईक माने हे पुढील तपास करीत आहेत.

अंघोळीला गेल्यावर चोरट्याने पळविला मोबाईल

घराचा दरवाजा उघडा ठेवून मोबाईल चार्जिंगला लावून अंघोळीला गेल्याची संधी साधून चोरट्याने मोबाईल लांबविला. संतोष नगर, बाळे येथे ही घटना घडली. याप्रकरणी सुशांत सुरेश काकडे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलिस नाईक नागटिळक हे घेत आहेत. चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत अडीच हजार रुपये होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मागील भांडणातून मारहाण

काल तू भावाला का मारले, म्हणून नबीरसूल शरीफ कन्याळ याने नूरअहमद नबीरसूल कोकटनूर यास मारहाण केली. तत्पूर्वी, नूरअहमद हा संशयित आरोपींच्या घरासमोरून जात असताना सातजणांनी भावाला मारहाण केल्याची फिर्याद अबुबकर नबीरसूल कोकटनूर (रा. सलगरवस्ती, डोणगाव रोड) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. त्यानुसार नबीरसूल कान्याळ, अयुब शरीफ कान्याळ, इस्माईल शरीफ कान्याळ, रफिक शरीफ कान्याळ, याकुब शरीफ कान्याळ, इब्राहिम शरीफ कान्याळ व इरफान इस्माईल कान्याळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी नूरअहमद याला शिवीगाळ करीत हॉकी स्टिकने हातावर मारहाण केली. या भांडणात त्याचे दात तुटल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस हवालदार श्री. बोराडे हे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com