esakal | स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ! मृताविरुद्धच गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ! मृताविरुद्धच गुन्हा दाखल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सोलापूर : स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार संतोष पिराजी सोलनकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश हनुमंत जाधव (रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुना कारंबा नाका ते जुना तुळजापूर नाका या दरम्यान, जुना तुळजापूर नाक्‍याकडे जाणाऱ्या पुणे ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पर्ल गार्डनजवळ मोटारसायकल दिनेश हनुमंत जाधव हा चालवत होता. त्याच्या मागे दिनेशचे वडील हनुमंत श्‍यामराव जाधव बसले होते. त्या वेळी दिनेशने स्वतःच्या ताब्यातील मोटारसायकल अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असून, दुचाकीवर मागे बसलेल्या वडिलांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

हेही वाचा: जिल्ह्यातील 74 बालविवाह रोखले ! कोरोना काळात का वाढले बालविवाह?

वाहनाची काच फोडून साडेतीन लाखांची चोरी

टेम्पोची काच फोडून चोरट्याने वाहनातील तीन लाख 46 हजार रुपयांची रोकड लंपास केली. सिद्धेश्‍वर मार्केट यार्डातील प्रीतम सेल्स कॉर्पोरेशन दुकानाजवळ ही घटना घडली. रोहन शशिकांत राऊत (रा. शिवालय बिल्डिंग, मेन रोड, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली. राऊत हे किरकोळ स्वरूपात किराणा मालाची विक्री करतात. त्यासाठी लागणारा माल फिर्यादी हे सिद्धेश्‍वर मार्केट यार्ड व सांगलीतून खरेदी करतात. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. लिगाडे हे करीत आहेत. दरम्यान, जेलरोड पोलिसांनी भाऊसाहेब गोडसे या तरुणाला पकडले असून डोक्‍यावरील कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासचे बंधन

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध घातले आहेत. एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यात प्रवास करण्यासाठी ई- पासची सक्‍ती केली आहे. त्यासाठी http://covid19.mhpolice.in/ यावर अर्ज करायचा आहे. रक्‍ताच्या नात्यातील व्यक्‍तीचा अंत्यविधी अथवा अत्यावश्‍यक सेवेसाठी जाणाऱ्यांनी संबंधित कागदपत्रे त्यावर अपलोड करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज करताना काही तांत्रिक अडथळा आल्यास जवळील पोलिस ठाण्यात जाऊन त्या ठिकाणी अर्ज करावा. त्यानंतर टोकन आयडी मंजूर झाल्यानंतरच ई- पास मिळेल आणि प्रवासाला परवानगी मिळेल, असेही पोलिस आयुक्‍तालयाने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top