
सोलापूर : शहर परिसरातील कावळ्यांच्या मृत्यूची साथ थांबलेली नाही. गेल्या चार दिवसांमध्ये ३८ कावळे आणि इतर जंगली पक्षांचा मृत्यू झाला. हे पक्षी किल्ला बाग आणि धर्मवीर संभाजी तलाव परिसरात मृत आढळले. पक्षांच्या मृत्यूची संख्या साधारण होईपर्यंत बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाचा पशुसंवर्धन आणि महापालिकेचा पशुसंवर्धन विभाग यासाठी दक्ष झाला आहे.