
सोलापूर : भद्रावती पेठेतील झाडावर असलेल्या नायलॉन मांजामुळे अडकलेल्या कावळ्याला वन्यजीव प्रेमींमुळे जीवदान मिळाले. रविवारी (ता. ८) दुपारी १ च्या सुमारास वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशनचे सदस्य शुभम बाबानगरे यांनी अजित चौहान यांना फोनवरून भद्रावती पेठेत एका पिंपळाच्या झाडावर कावळा पक्षी मांजामध्ये अडकल्या बाबत सांगितले.