राज्यातील 51 साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला ! सोलापूर विभागातील सर्वाधिक 31 कारखाने झाले बंद

Sugar Factory
Sugar Factory
Updated on

माळीनगर (सोलापूर) : राज्यात यंदा सुरू झालेल्या 188 साखर कारखान्यांपैकी 18 मार्चअखेर 51 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. सोलापूर विभागातील 42 पैकी सर्वाधिक 31 कारखाने बंद झाले आहेत. दरम्यान, चालू गळीत हंगामात राज्यात 18 मार्च 2021 अखेर 915.10 लाख टन उसाचे गाळप होऊन 951.65 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा साखर उतारा 10.40 टक्के आहे. गाळप व सरासरी साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. 

साखर आयुक्तालयाने ऊस गाळपाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. यंदा राज्यात 95 सहकारी व 93 खासगी मिळून 188 कारखाने सुरू झाले होते. या सर्व कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता सात लाख 20 हजार 480 लाख टन आहे. साखरेचे उत्पादन घटवून अल्कोहोल निर्मितीस प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणास राज्यातील साखर कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे आकडेवारीवरून जाणवत आहे. अनेक कारखान्यांनी उसाचा रस व बी-हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल उत्पादनास प्राधान्य दिल्याने कारखान्यांच्या साखर उताऱ्यात घट झाल्याचे दिसते. परिणामी राज्याचा सरासरी साखर उतारा देखील घटला आहे. 

जिल्हानिहाय साखर उत्पादन 
कोल्हापूर विभागातील 37 कारखान्यांत 220.88 लाख टन उसाचे गाळप होऊन 11.94 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 263.64 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागातील 31 कारखान्यांत 203.63 लाख टन गाळप होऊन 219.67 लाख क्विंटल, सोलापूर विभागातील 42 कारखान्यात 173.23 लाख टन गाळप होऊन 161.94 लाख क्विंटल, नगर विभागातील 26 कारखान्यांत 141.16 लाख टन गाळप होऊन 136.38 लाख क्विंटल, औरंगाबाद विभागातील 22 कारखान्यात 82.03 लाख टन गाळप होऊन 77.35 लाख क्विंटल, नांदेड विभागातील 25 कारखान्यांत 84.58 लाख टन गाळप होऊन 84.07 लाख क्विंटल तर अमरावती व नागपूर विभागात अनुक्रमे 5.20 लाख क्विंटल व 3.40 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com