esakal | ग्राहक संख्या : आयडिया नंबरवन, जिओ नंबर दोन 
sakal

बोलून बातमी शोधा

mobile

डाक सेवेची धडपड 
राज्याच्या ग्रामीण भागात 11 हजार 50 तर नागरी भागात एक हजार 237 अशी 12 हजार 744 डाक कार्यालये कार्यान्वित आहेत. 2017-18 मध्ये 12 हजार 614 एवढी डाक कार्यालय होती. 2018-19 मध्ये डाक कार्यालयात वाढ झाली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात 35 हजार 842 तर नागरी भागात सात हजार 934 एवढ्या टपाल पेट्या आहेत. राज्यात 2017-18 मध्ये राज्यातील टपाल पेट्यांची संख्या 43 हजार 829 एवढी होती. 2018-19 मध्ये राज्यातील टपाल पेट्यांची संख्या 43 हजार 776 एवढी झाली आहे. 

ग्राहक संख्या : आयडिया नंबरवन, जिओ नंबर दोन 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : मोबाईलने क्रांती घडवली. मोबाईलमुळे अनेक साधने काळाच्या ओघात अडगळीत पडली. ट्रंक कॉल, लॅंडलाइन, पेजरमार्गे संपर्काच्या साधनाचा प्रवास मोबाईलपर्यंत आला आहे. मोबाईलचा हा प्रवास थक्क करणारा आहे. मोबाईलच्या जमान्यात आजही राज्यातील 44 लाख 89 हजार ग्राहक लॅंडलाइनचा वापर करत असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतून समोर आली आहे. महाराष्ट्रात एमटीएनएल, बीएसएनएल, भारती व टाटा, टेलिनॉर, आयडिया व वोडाफोन, रिलायन्स जिओ, रिलायन्स कॉम, एअरसेल डिशनेट या प्रमुख कंपन्यांच्या वतीने मोबाईल सेवा पुरविली जाते. महाराष्ट्रात सध्या 13 कोटी 10 लाख 85 हजार इतके मोबाईलधारक असल्याचेही या पाहणीत समोर आले आहे. 
हेही वाचा - खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर यांना तूर्त दिलासा... 
2018-19 मध्ये राज्यात 44 लाख 45 हजार जण लॅंडलाइनचा वापर करत होते. त्यातुलनेत 2019-20 मध्ये लॅंडलाइन वापरणाऱ्या ग्राहकांत वाढ झाली आहे. सध्या 44 लाख 89 हजार इतके ग्राहक लॅंडलाइन वापरत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्राहक आयडिया-वोडाफोन या कंपनीचे आहेत. पाच कोटी 39 लाख ग्राहक या कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल रिलायन्स जिओचा नंबर असून रिलायन्स जिओचे चार कोटी 32 लाख एवढे ग्राहक असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. भारती व टाटा या कंपनीच्या ग्राहकांची दोन कोटी 56 लाख तर बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या 71 लाख एवढी आहे. राज्यात सप्टेंबर 2019 अखेर इंटरनेट ग्राहकांची संख्या आठ कोटी 70 लाख एवढी होती. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे.

loading image
go to top