esakal | सायकल चालवा, पर्यावरण वाचवा ! शेतकऱ्याच्या मुलीचा 27 जिल्हे अन्‌ 13000 किमी प्रवास I Environment
sakal

बोलून बातमी शोधा

Pranali Chikate

सायकल चालवा, पर्यावरण वाचवा ! शेतकऱ्याच्या मुलीचा 27 जिल्हे अन्‌ 13000 किमी प्रवास

sakal_logo
By
मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) - बदलती उपभोगवादी जीवनशैली, वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरणातील बदल, ऋतुचक्र बदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेवून पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी एका शेतकऱ्याच्या पोरीची सुरु झालेली सायकल वारी आज पंढरीत विठुरायाच्या दारात आली आहे. प्रणाली विठ्ठल चिकटे असे या मुलीचे नाव आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट येथील एका शेतकरी कुटुंबातील प्रणाली चिकटे ही मुलगी पर्यावरण वाचवण्यासाठी महाराष्ट्रभर सायकलने प्रवास करत आहे. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा असे ती सांगत आहे. घराबाहेर पडून तिला अकरा महिन्यापेक्षाही जास्त दिवस झालेत. या काळात तिने महाराष्ट्रातील सुमारे 27 जिल्हे पार करत सायकलवर सुमारे 13 हजार 200 किलोमिटरचा प्रवास पूर्ण केला आहे. प्रवासात आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या व्यक्तींना भेटी देत ती पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती करत आहे. प्रवासातील वाटेत भेटणाऱ्या लोकांच्या समस्याबाबत ती चर्चा करते.

याबाबत तिच्याशी संवाद साधला तेंव्हा तिने माझा हा प्रवास स्व जबाबदारीचा असून लोकांकडे खाणे, त्यांच्यातच राहणे, असा असतो. म्हणून सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगते.

हेही वाचा: वारकरी संप्रदायाने घेतली श्रीश्री रविशंकर यांची भेट

पर्यावरण वाचवण्यासाठीची 'ती'ची पंचसुत्री

- आपल्या आरोग्यासाठी वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी, मोटारगाडीचा वापर टाळून, शक्‍य ती कामे सायकलने करू

- प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळू यात. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवू

- परिसरात स्थानिक झाडे लावू व जगवू. अनावश्‍यक वस्तूंच्या गरजा टाळून, अत्यंत आवश्‍यक वस्तूंचा वापर करू

- आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू यात आणि आपले आरोग्य सुधारू

- 'पाणी आडवा व पाणी जिरवा' या कामात सहभाग घेऊ

पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण जनजागृती आणि लोकल परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी मी महाराष्ट्रभर सायकलने प्रवास करत आहे. आज माझी ही सायकल वारी पंढरीत आल्याचा मला खूप आनंद वाटतोय. या संदर्भातील अहवाल मी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणमंत्री यांच्याकडे सादर करणार आहे.

- प्रणाली चिकटे, पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ

loading image
go to top