Milk Rate Decrease : दूध दरकपातीमुळे रोज २४ लाखांचा फटका; प्रतिलिटर दोन रुपये कपात

पुणे जिल्ह्यातील दोन मोठ्या खाजगी उद्योगांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये इतकी कपात केली आहे.
Milk Rate

Milk Rate

sakal

Updated on

- संदीप गायकवाड

उ. सोलापूर - जिल्ह्यातून दूध संकलन करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील दोन मोठ्या खाजगी उद्योगांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात कपात केली आहे. प्रतिलिटर दोन रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दररोज २४ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दूध व्यवसायात सुधारणा दिसू लागली होती. मात्र, युद्धाचे कारण पुढे करत खाजगी उद्योगांनी पुन्हा एकदा दरात कपात करत शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com