
सोलापूर: दुचाकी अडवून पाचजणांनी केलेल्या मारहाणीत एक तरुण जखमी झाला. तसेच त्यांनी त्याच्यासह घरातील पाचजणांना मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली. २९ जुलै रोजी रात्री आठ ते नऊ या वेळेत साईबाबा चौकात ही घटना घडली. याप्रकरणी त्या पाचजणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती ॲट्रॉसिटी सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.