
सोलापूर : निवडणुकीच्या तापलेल्या आखाड्यात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना थकीत पगार सह विविध प्रलंबित मागण्यासाठी कामगारांनी कारखान्यासमोर ठिय्या मारत बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले. विद्यमान संचालक मंडळाच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच हे आंदोलन उभारण्यात आले.ऐनवेळी कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे मोठी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली यावेळी त्यांनी गेल्या आठ महिने पगार नसल्याने कामगारांना उपासमारीची वेळ आली कार्यकारी संचालकांना वेळोवेळी निवेदने दिली कार्यकारी संचालक गणेशकर यांनी दि 6 जुलै रोजी पगारी बाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची कोणतीही पूर्तता न केल्याने संतप्त कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये 8 महिन्याचा थकीत पगार प्राधान्याने पुर्णपणे द्यावा, हंगामी कामगारांचा सन 2021 चा रिटेंशन अलौंस व 2022 ची लिव्ह सॅलरी थकीत आहे , सन 2020 साली जाहीर केलेला 10 दिवसाचा बक्षीस पगार देणे थकीत आहे तो पुर्णपणे द्यावा, सेवामुक्त व मयत कामगारांचे फायनल पेमेंट अंदाजे 5 ते 7 वर्षापासून थकीत आहे तो पूर्णपणे द्यावा.मागील 15 टक्के व 12 टक्के पगारवाढीच्या फरकाची रक्कम थकीत आहे, कामगारांचा ऑक्टोबर 2019 पासून चालु मे 2022 पर्यंतचा 31 महिने प्रॉव्हिडंट फंड भरला नाही. त्यामुळे ज्या कर्मचा-याचे 58 वर्ष वय पूर्ण झाले आहे व जे निवृत्त झाले आहेत त्यांना पेंशनचा लाभ मिळत नसलेने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे संपुर्ण फंड भरणा करावा.,कामगार पतसंस्थेची पगारातून कपात केलेली रक्कम अंदाजे 2 कोटी 50 लाख कारखान्याकडे थकीत असलेने कामगारांना कर्ज सुध्दा मिळत नाही.
पतसंस्थेची रक्कमा देण्यात याव्यात, वार्षिक वेतनवाढीच्या फरकाची रक्कम देणे थकीत आहे त्या प्राधान्याने पुर्ण द्यावात., दोन बोनस व एक बोनसची फरक रक्कम देणे थकीत आहे. बोनसची रक्कम देणेत यावी अशा प्रलंबित मागण्याची तात्काळ पूर्तता करावी असे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
आमदार समाधान आवताडे हे मरवडे येथील प्रचार सभेत असल्यामुळे त्यांचे प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होताच तात्काळ पाठवत आहे .मागील संचालक मंडळाचे 145 कोटीचे कर्ज 72 कोटी 60 लाख केले असताना कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे समविचारी गटाच्या नेत्याचा हात असून हे आंदोलन पूर्वनियोजित आहे. आमच्या पॅनलला बदनाम करण्यासाठी कामगारांना धमकावुन प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यासाठी परावर्त केले.
- समाधान आवताडे अध्यक्ष-दामाजी कारखाना
Web Title: Damaji Sahakari Sugar Factory Election Workers Protest Pending Salary And Demands Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..