
मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरीतील समविचारीची आघाडीला मिळालेली आघाडी दुसऱ्या फेरीत ही कायम राहिली उर्वरित दोन फेरीनंतर दामाजीचा सत्ताधारी कोण हे स्पष्ट होणार आहे. आज स.8 वाजता मतमोजणी प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीत समविचारी गटाच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलालाची उजळण करण्यात आली व फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली पहिल्या फेरीमध्ये मंगळवेढा ऊस उत्पादकातील ऊस उत्पादक गटातील बहुतांश गावे व ब्रह्मपुरी उस उत्पादक गटातील काही गावांचा समावेश होता परंतु या पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाला आघाडी मिळणे अपेक्षित होते परंतु याच गटात सत्ताधारी गटांना आघाडी मिळाली नाही पहिल्या फेरीत समविचारी गटाला मिळालेली आघाडी दुसऱ्या फेरीत कायम राहिली.
दुसऱ्या फेरीत ब्रह्मपुरी ,सिद्धापूर ,आरळी,तांडोर, तर मरवडे ऊस उत्पादक गटातील मरवडे ,नंदुर,भाळवणी,जंगलगी/बावची , रड्डे ,जालीहाळ ,फटेवाडी , जित्ती/निंबोणी ,खोमनाळ ,येड्राव बालाजीनगर/कागष्ट या गावांची मतमोजणी करण्यात आली दुसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते कंसात दुसय्रा फेरीअखेरील मते पुढील प्रमाणे...
आमदार समाधान आवताडे 2512(5505) ,नीला आटकळे 2441(5167) , दिलीप जाधव 78(149) मुरलीधर दत्तू 3503(6620),गौरीशंकर बुरकुल 3492(6506),गोपाळ भगरे 3434(6435),मारुती वाकडे 11(42) राजेंद्र सुरवसे 2219(4698) बाद 323(648) ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गट सचिन चौगुले 2555(5296)राजेंद्र चरणू पाटील 3520(6837), राजेंद्र सर्जेराव पाटील 2491(5306) भारत बेदरे 3357(6486) अशोक भिंगे 2441(5064) , दयानंद सोनगे 3386(3394) , बाद मते 295(543) , मरवडे ऊस उत्पादक गट प्रदीप खांडेकर 2595(5485), गणेश पाटील 2529(5281) , बसवेश्वर पाटील 2360(5051) ,शिवानंद पाटील 3627(6903) ,रेवणसिद्ध लिगाडे 3407(6465),औदुंबर वाडदेकर 3441(6545) बाद मते 255(494) भोसे ऊस उत्पादक गट उमाशंकर कनशेट्टी 2495(5313), अंबादास कुलकर्णी 2483(5309), भीवा दौलतोडे 3573(6762) ,बसवराज पाटील 3559(6728) , गौडाप्पा बिराजदार 3478(5635) आबा बंडगर 2382(5082) आंधळगाव ऊस उत्पादक गट नवनाथ आसबे 20(87) , प्रकाश भिवाजी पाटील 3563(6774) , दिगंबर भाकरे 3512(6730), सुरेश भाकरे 2512(5382), महादेव लुगडे 3407(6438) , विनायक यादव 2452(5176)बाळासो शिंदे 2376(5040) बाद मते 255 (477)
महिला राखीव निर्मला काकडे 3598(6791),लता कोळेकर 3545(6632) कविता निकम 2419(5214), स्मिता म्हमाने 2362(5062),बाद मते 267(516) , मागासवर्गीय मतदार संघ तानाजी कांबळे 3569(6691) युवराज शिंदे 2536(5441) बाद मते 207(400) भटक्या विमुक्त जाती मतदार संघ तानाजी खरात 3647(6954) विजय माने 2513(5293) बाद मते 185(318)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.