मोठ्या आवाजात हेडफोन वापरणे धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : मोठ्या आवाजात हेडफोन वापरणे धोकादायक

सोलापूर : मोठ्या आवाजात हेडफोन वापरणे धोकादायक

सोलापूर : मोबाइलचा वापर लक्षात घेता हेडफोन, इअरफोनचा वापर शक्‍यतो गरजेपुरता व मर्यादीत डेसिबलमध्ये करणे उपयुक्त आहे. गरजेपेक्षा अधिक विशेषतः मनोरंजनासाठी मोठ्या आवाजात हेडफोन किंवा इअरफोनद्वारे ऐकणे चुकीचे ठरते. कानाच्या आरोग्यासाठी नियमित तपासणीदेखील महत्त्वाची आहे.

सर्वसाधारणपणे डॉल्बी व फटाक्‍यांचा आवाज अतिशय धोकादायक आहे. या आवाजाने कानाच्या पडद्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे या आवाजापासून दूर राहणे किंवा टाळणे अत्यंत महत्वाचे असते. अनेकवेळा कारखान्यामध्ये मोठा आवाज करणाऱ्या यंत्रासोबत काम करावे लागते. त्याला इंडस्ट्रियल नॉईज असे म्हटले जाते. त्यावेळीदेखील कामाचे तास संपल्यानंतर तेथे न थांबता या आवाजापासून दूर गेले पाहिजे. अन्यथा कानाची तात्परुती किंवा कायमस्वरुपी हानी होण्याची शक्‍यता असते. अशा कामगारांनी वर्षातून एकदा कानांची तपासणी करायलाच हवी.

हेही वाचा: जिल्हा रुग्णालय जळीतकांड : डॉ. सुनील पोखरणा यांचा जबाब नोंदविला

वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाइन शिक्षण

कोविड काळात संगणकावर काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत वर्क फ्रॉम होमही केले जात आहे. त्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरावा लागतो. अनेकांना त्यामुळे काम संपल्यावरदेखील हेडफोन वापरण्याची सवय लागते. तसेच मनोरंजनात संगीत ऐकण्यासाठी त्याचा हेडफोन वापरला जातो. या स्थितीत केवळ कामाच्या गरजेपुरता हेडफोन वापरावा. नंतर सर्वसामान्यपणे हेडफोनशिवाय इतर कामे करावीत. तसेच स्पिकर ऑन करून अभ्यास एकाग्रतेने होत असेल तर ते योग्यच आहे. साधारणपणे अनेक तास हेडफोन लावल्याने नंतर चिडचिड होणे, मन एकाग्र न होणे या प्रकारच्या तक्रारी अधिक असतात.

हेही वाचा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आजपासून अन्नत्याग सत्याग्रह

ठळक बाबी

  • हेडफोन किंवा इअरफोनचा वापर मर्यादीत असावा

  • खूप मोठा आवाज करून संगीत ऐकणे धोकादायक

  • वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाइन शिक्षणात ५ ते ७ तासच हेडफोन वापरावा

  • इंडस्ट्रियल नॉईजचा त्रास असणाऱ्यांनी वर्षातून एकदा कानाची तपासणी करावी

  • इअरफोन किंवा हेडफोनचा वापर

आजकाल मुले मोठ्या प्रमाणात इअरफोन किंवा हेडफोन कानाला लावून संगीत ऐकत असतात. मात्र तासन्‌तास संगीत मोठ्या आवाजात ऐकणे धोकादायक आहे. तसेच फुल्ल व्हॉल्युममध्ये संगीत ऐकणे त्रासदायक ठरू शकते. या प्रकारचा आवाज ९० डेसिबलपर्यंत असेल तर ते धोकादायक आहे. अद्याप हेडफोनच्या अतिवापराचे दुष्परिणामावर ठोस संशोधन झालेले नाही. तरीही डेसिबलची मर्यादा अधिक असू नये हा नियम लागू होतो.

loading image
go to top