Solapur News : कर विभागातील फायलींना फुटले पाय; डबल खरेदीला महापालिकेकडून प्रोत्साहन

गावठाणचे स्कॅनिंग पूर्ण, हद्दवाढीतील फायलीच गायब
solapur municipal corporation
solapur municipal corporationsakal

सोलापूर - महापालिका बांधकाम विभागानंतर फायली गायब होण्याचे प्रमाण कर विभागात अधिक आहे. या विभागातील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी फाइलींच्या स्कॅनिंगला सुरवात केली. मात्र हद्दवाढ भागातील मिळकतींच्या बऱ्याच फायली गायब असल्याने वर्ष उलटले या भागातील स्कॅनिंग होऊ शकले नाही. ज्या भागातील मिळकतींचे दस्तऐवज गायब आहेत, त्याच परिसरात डबल खरेदी प्रकाराला प्रोत्साहन मिळते, हा योगायोग कसा असू शकतो?

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी बांधकाम विभागानंतर आता कर विभागाकडे लक्ष घालण्याची गरज आहे. ज्या भागातील मिळकतींच्या फायलींना कर विभागातून पाय फुटले, त्याचा छेड लावून संबंधितांना याप्रकरणी हिसका दाखविण्याची गरज आहे, त्यामधून महापालिकेचे आर्थिक हित साधले जाईल.

महापालिकेचा कर विभाग हा महसुली उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मिळकतींच्या वार्षिक कराबरोबर मिळकतींच्या हस्तांतरणातूनही महापालिकेला मोठे उत्पन्न मिळते. सध्या महापालिकेकडे शहरातील दोन लाख ४१ हजार मिळकतींची नोंद आहे. यातील ६० टक्के मिळकती या हद्दवाढ भागातील आहेत.

solapur municipal corporation
Solapur : सांगोल्यासाठी पुरवणी निधी अर्थसंकल्पात ३५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर; आमदार शहाजी पाटील

२०१५ पूर्वी हद्दवाढ भागातील मिळकतींच्या नोंदणी या नोटरीवरून होत असत. नोटरीवरून रजिस्टरला नोंद करण्याची ही जुनी पध्दत. त्यानंतर नोटरीवरून मिळकतींच्या नोंदी घेण्याची पध्दत बंद झाली. खरेदी-विक्री रजिस्टर ऑफिसमध्ये झालेल्या दस्तऐवजावर नोंदणी करण्याचा नियम लागू करण्यात आला.

दरम्यान, कर विभागातील काही अधिकाऱ्यांनी नोटरीवरची जुनी नोंदणी पध्दत छुप्या पद्धतीने चालूच ठेवली. त्यामुळे एकाच मिळकतींची चुकीच्या पद्धतीने झालेल्या डबल खरेदीदाराला एक प्रकारचे प्रोत्साहनच मिळाले. आर्थिक फसवणूक करून जागा लुबाडणाऱ्या टोळींसाठी महापालिका कर्मचारी सक्रिय झाले.

solapur municipal corporation
Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पर्यावरण भुषण पुरस्कार प्रविण तळेंना जाहीर

तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी जनता दरबारामध्ये आलेल्या तक्रारीवरून गेली अनेक वर्षांपासून कर विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची प्राधान्याने इतर विभागात बदली केली. कर विभागात पारदर्शी कारभार व्हावा, या उद्देशाने कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ऑनलाइन डाटा तयार करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या वर्षभरात कर विभागातील फायलींचे पेठनिहाय स्कॅनिंग सुरू आहे.

गावठाण भागातील फायलींची स्कॅनिंग प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी हद्दवाढ भागातील बहुतांश फायली गायब असल्याने पेठनिहाय सुरू असलेल्या स्कॅनिंगमध्ये अडथळे निर्माण होत आहे. आता बांधकाम विभागानंतर कर विभागातील कारभाराच्या सुधारणेसाठी आयुक्तांकडून स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

solapur municipal corporation
Solapur Accident : कुर्डुवाडीत मद्यधुंद तरुणाचा थरार; पोलिसांची जीप पळवून दुचाकींना दिली धडक

शहर गावठाणमधील मिळकतींचे साधारण ८० हजार दफ्तरीहुकूम कागदपत्रांचे स्कॅनिंग करून पूर्ण झाले आहे. हद्दवाढ भागाचे काम सुरू आहे. अनेकवेळा या विभागातून बदली होऊन जाणारा आणि बदलीने नव्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजाच्या चार्टची देवाणघेवाण यापूर्वी झाली नाही.

त्यामुळे एखादी तक्रार आल्यानंतर हे प्रकरण समोर येतो. त्यानंतर रेकॉर्डचा शोध घेतला जातो. रेकॉर्ड कोणाकडे आहे, त्यावेळी कोणाची जबाबदारी होती, कोणाच्या कार्यकाळातला मिळकतीची नोंद झाली आहे. याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे रेकॉर्डही मिळत नसल्याच्या घटना घडतात. रेकॉर्ड नसलेल्या तक्रारी माझ्याकडे आल्या नाहीत, मी माहिती घेतो.

‘या’ ठिकाणच्या फायली मोठ्या प्रमाणात गहाळ

जुळे सोलापूर परिसर, नई जिंदगी, निलम नगर, शेळगी, सैफूल, सोरेगाव, कुमठा, हत्तुरेवस्ती या हद्दवाढ परिसरातील फायली गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. मूळ रेकॉर्ड नसलेल्या मिळकतींची संख्या काही हजारांमध्ये आहे.

काय आहेत तक्रारी?

  • जागेच्या अनेक प्रकरणात डबल खरेदी अन्‌ दुबार नोंदणी.

  • एकाच मिळकतीवर ऑनलाइनला आणि रजिस्टरला वेगवेगळी नावे.

  • चुकीच्या पद्धतीने नोंद घेतलेल्या मिळकतींचे रेकॉर्ड गायब.

  • ऑनलाईनमध्ये दहा वर्षांपासूनची नोंद.

  • रिव्हिजन नसल्याने पॉपर्टी बुक भरणा नाहीच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com