esakal | Solapur: वृक्षलागवड आणि संवर्धनाचा छंद जोपासणारे त्रिकूट
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षलागवड आणि संवर्धनाचा छंद जोपासणारे त्रिकूट

या तीन मित्रांनी 22 वृक्षांच्या रोपांची लागवड करून यशस्वी संगोपनही केले आहे.

वृक्षलागवड आणि संवर्धनाचा छंद जोपासणारे त्रिकूट

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर): ना ते सरकारी कर्मचारी, ना त्यांना वृक्ष लागवडीचा सरकारी आदेश, ना 'एक पद एक झाड' लागवडीसाठीची फोटो पुरती धडपड, ना जुन्याच खड्डयात एक रोप लावून सवंग प्रसिद्धीसाठी फोटो काढण्यापुरती धावपळ. प्रसिद्धी पासून दूर राहून त्यांनी स्मशानभूमी, छोट्या पाझर तलावाचा भराव, उजाड बोडके माळरान अशा विविध ठिकाणी स्वखर्चाने व श्रमदान करून वड, उंबर, पेरु, चिकू या रोपांची लागवड केली आहे.

हेही वाचा: वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून;पाहा व्हिडिओ

वृक्षलागवड आणि संवर्धनाचा छंद जोपासणारे मोहोळ येथील 'डायमंड' या तीनचाकी, चारचाकी वाहन दुरुस्ती गॅरेजचे चालक दत्तात्रय केवळे, परिवहन विभाग सोलापूर येथील निवृत्त अभियंता मोहन मोहिते व सेवानिवृत्त बसचालक दिगंबर ताकमोगे या तीन मित्रांनी 22 वृक्षांच्या रोपांची लागवड करून यशस्वी संगोपनही केले आहे. या बाबत मोहन मोहिते यांनी सांगितले की,"नर्सरीतून रोपे आणतानाच ती मोठी व तीन ते चार फूट उंचीची घेतली होती. पावसामुळे त्यांची वाढ जोमात झाली आहे. याला शेळ्या, मेंढ्या खातात म्हणून काटेरी कुंपण केले आहे. काही झाडांना लोखंडी व फायबर जाळीचे ट्रीगार्ड बसवले होते, पण भंगार गोळा करणारे लोकांनी ते काढून नेल्यामुळे आता काटेरी कुंपण केले आहे. झाडांची उंची चांगली वाढल्याने शेळ्यांच्या तोंडाला झाडाचा शेंडा येत नाही. त्यामुळे वाढ चांगली होत आहे.

हेही वाचा: खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून,शोध सुरु

जोमात वाढणारी झाडे पाहून आम्हालाही झाडे लावल्याचे समाधान मिळत आहे. या 22 रोपांचे रोपण करून यशस्वी संगोपन केले आहे. "आठवड्यातून एकदा स्वतःच्या सायकलला टिकाव, खोऱ्या, कुऱ्हाड, खुरपे, पाण्याच्या दोन घागरी लावून जिथे जिथे झाडे लावली आहेत, तिथे पहाटे साडे पाच ते सात वाजेपर्यंत हे लोक जातात. लावलेल्या रोपाच्या भोवती वाढलेले गवत, काटेरी झुडपे काढतात. रोपाच्या आळ्यात वाढलेले गवत खुरपणी करून काढतात. त्याला जाता येता माळरानावर पडलेले शेण, मेंढरांचे लेंडी खत गोळा करून त्या झाडांना घालतात. तिथून जवळ कुठे उपलब्ध असलेल्या जवळच्या शेतकऱ्याच्या शेतात सायकलला दोन घागरी लावून विहीर, शेततळे, हातपंप, पाझर तलावातील पाणी आणून त्या झाडांना घालतात. सर्वजण स्वयंप्रेरणेने हे काम करत आहेत. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"आज आम्ही लावलेल्या झाडांची सावली, फळे आम्हाला मिळणार नाही, पण पुढच्या पिढीला मात्र नक्की मिळणार आहे. आम्ही गेलो तरी आमच्या मागे आमचं नाव या झाडांच्या रुपातून पुढे कायम राहणार आहे. वृक्ष लागवड ही काळची गरज आहे हे प्रत्येकाने ओळखून दर वर्षी किमान दोन तरी झाडे लावली पाहिजेत."

- मोहन मोहिते, निवृत्त परिवहन अभियंता, सोलापूर आगार. (सध्या मोहोळ)

loading image
go to top