महाविद्यालयीन परीक्षेचा निर्णय! ग्रीन, ऑरेंज, रेड झोनसाठी स्वतंत्र नियोजन

eduction
eduction

सोलापूर : मार्च-एप्रिलपर्यंत संपणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षा अजून झाल्या नसून कोरोनामुळे परीक्षा घ्यायच्या कशा, असा पेच निर्माण झाला आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नियुक्त केलेल्या डॉ. आर. सी. कुहाड यांच्या समितीने हा पेच सोडवला असून समितीने आपला अहवाल मान्यतेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविला आहे.
मार्च महिन्यात पाऊल ठेवलेला कोरोना हा विषाणू अद्याप देशातून हद्दपार झालेला नाही. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये या विषाणूने एप्रिलमध्ये पाऊल रोवले. ग्रीन झोनमधील काही जिल्हे अचानकपणे ऑरेंज, रेड झोनमध्ये गेले. कोरोनाचा संसर्ग खंडीत करण्यासाठी सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन होण्याची गरज असून नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे खूप महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात अथवा विद्यापीठात परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक मानले जात आहे. त्यामुळे यंदा ऑनलाईनच्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोच केली जाण्याची दाट शक्यता महाराष्ट्रासाठी नियुक्त समितीतील एका जेष्ठ सदस्यांनी व्यक्त केली. पदवीच्या (बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीए, बीई, बी फार्मसी, लॉ व अन्य) आणि (एमए, एमकॉम, एमएस्सी, एमसीए, एमई, एम फार्मसी) या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा निश्चितपणे घेण्यात येणार असून त्यासाठी देशभर एकच पॅटर्न तयार केला आहे. वेळ कमी असल्याने परीक्षा व निकालाच्या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांच्या करिअरला बसू नये, याची खबरदारी डॉ. कुहाड यांच्या समितीने घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सोय नाही त्यांच्यासाठी सामाजिक अंतर ठेवून महाविद्यालयात सोय केली जावू शकते अथवा प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांच्या सरासरीनुसार निकाल लावले जातील, त्याचा निर्णय काही दिवसांत जाहीर होईल असेही त्या वरिष्ठ सदस्याने सांगितले.

प्रथम, द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांना सरासरीनुसार गुण?
कोरोनाच्या संकटामुळे महाविद्यालयीन परीक्षांचा पुरता खेळखंडोबा झाला असून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रत्येक सत्राच्या परीक्षा आणि निकालासाठी किमान चार अडीच ते तीन महिने लागतात. मात्र, आता देशातील 821 विद्यापीठांमधील तब्बल पाच कोटींहून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेचे नियोजन कमी वेळेत करणे व निकाल लावणे अशक्य मानले जात आहे. त्यामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे करिअरचे महत्वाचे वर्ष असल्याने त्यांच्या परीक्षा होतील. परंतु, अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळता अन्य विद्यार्थ्यांना मागील परीक्षेच्या गुणांची सरासरी करून गुण दिले जातील, असे राज्यपाल नियुक्त समितीतील एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. कोरोना हद्दपार होण्यासाठी खबरदारी म्हणून सामाजिक अंतरासह अन्य नियम आणखी काही दिवस पाळावेच लागणार आहेत. त्यामुळे ऑगस्टच्या मध्यावधीपासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मात्र, याची अधिकृत घोषणा काही दिवसांत 'युजीसी' करेल असेही ते म्हणाले.

राज्यपाल नियुक्त समितीच्या सदस्यांना वाटते...

  • देशातील सर्व 821 विद्यापीठांच्या परीक्षा पद्धती, गुणांकन पद्धती, निकाल व परीक्षेचा कालावधी याच्या माहितीनुसार 'युजीसी'च्या समितीने घेतला निर्णय
  • देशातील संपूर्ण लॉकडाउन 3 मे रोजी नाही उठल्यास पदवी व पदविकाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्याच होतील विद्यापीठांमार्फत परीक्षा; प्रश्नपत्रिका बहुपर्यायी राहील
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्रीन, ऑरेंज, रेड एरियासाठी स्वतंत्र राहील नियोजन; दीड महिन्यात परीक्षा तर 15 दिवसांत (जूनपर्यंत) निकाल लावण्याचे नियोजन
  • कोरोना देशातून हद्दपार होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सर्वच विद्यापीठांमध्ये ऑनलाईन टिचिंगची ली जाणार व्यवस्था; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कुलगुरूंना सूचना
  • अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळता अन्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयांमार्फत होतील; संपूर्ण लॉकडाउन न उठल्यास प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मिळतील मागील सरासरीवरून गुण 
  • विद्यापीठ अनुदान आयोगाने नियुक्त केलेल्या डॉ. आर. सी. कुहाड यांच्या समितीचा अहवाल तयार; केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मान्यतेनंतर चार दिवसांत जाहीर होईल परीक्षेचा पॅटर्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com