शिक्षण विभागाच्या "या' निर्णयामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमधून नाराजी !

Class Ten
Class Ten
Updated on

दक्षिण सोलापूर : यंदा एप्रिल 2021 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (दहावी) यापूर्वी ज्यांनी चित्रकलेतील शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट) उत्तीर्ण केलेली आहे त्यांना त्याचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नये, असा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याने दहावीतील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. या निर्णयाचा पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून निषेध केला जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरसकट पास करण्याचे धोरण राबवीत असतानाच विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमास मूठमाती मिळेल, असा एकतर्फी निर्णय शासनाकडून घेण्यात येत आहे. असाच एक चुकीचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 26 मार्च रोजी घेतला आहे. एप्रिल 2021 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (10 वी) यापूर्वी ज्यांनी चित्रकलेतील शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट) उत्तीर्ण केलेली आहे, त्यांना त्याचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.

वास्तविक पाहता, प्रतिवर्षी या परीक्षेस महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी प्रविष्ट होतात. विद्यार्थी, पालक, शिक्षक हे सलग तीन-चार महिने कष्ट घेऊन या परीक्षेस आपल्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना प्रविष्ट करतात. या परीक्षेस प्रविष्ट होण्यामागे कलेचा प्रसार- प्रचार होणे हा उद्देश तर असतोच, त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण मिळवणे हा देखील एक उद्देश असतो. पण शासनाच्या या एका एकतर्फी निर्णयामुळे आज लाखो विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या व शिक्षकांच्या कष्टावर पाणी पडणार आहे. 

या निर्णयामुळे शिक्षण विभाग आणि कला - संस्कृती जपणाऱ्या कला संचालनालय यांच्यातील सावळागोंधळ पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेस आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागास 26 मार्च 2021 च्या परिपत्रकातील दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा रद्द करून तसा जीआर लवकरात लवकर काढण्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे. यंदा एप्रिल 2021 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या व ज्यांनी यापूर्वीच इंटरमिजिएट ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त सवलतीचे गुण द्यावेत, अशी मागणी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mangalwedha Water Crisis Deepens As Shirnandgi Lake Dries Up And 11 Transformers Lose Power Affecting Farm Crops
Solapur Zilla Parishad Audit Flags 2 Point 13 Crore Rent Paid To 37 Ashram Schools Over Additional Space Claims
solapur district court
boramani murder case
Marathi News Esakal
www.esakal.com