

सोलापूर: महापालिका निकालाच्या दोन दिवसानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर या निवडणुकांना सामोरे गेलो, शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो असे म्हणत हा पराभव वेदनादायक असला तरी तो अंतिम नसल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.