देगाव उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात! अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५५ हजार एकर जमिनीला मिळणार पाणी; होटगी हद्दीत पंपहाऊस, बंदिस्त नलिकेचे काम सुरु

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची देगाव उपसा सिंचन योजना आता पूर्णत्वाकडे जात आहे. देगाव परिसरातील रेल्वे रुळावरील जलसेतूचे काम १४ वर्षांनंतर आता पूर्ण झाले आहे. सध्या देगाव शाखा कालव्याचे २८ किलोमीटर काम पूर्ण झाले असून तेथून पुढे होटगीच्या हद्दीत मोठे पंपहाऊस बांधले जात आहे.
Degaon-Solapur
Degaon-Solapursakal
Updated on

सोलापूर : देगाव जलसेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर आता देगाव उपसा सिंचन योजनेतून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील ५२ ते ५५ हजार एकर जमिनीला उजनी धरणाचे पाणी मिळणार आहे. मार्चमध्ये उजनीतून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर देगाव योजनेचे (२८ किमी) दुसऱ्यांदा ट्रायल होणार आहे. सुरवातीला बाराशे हेक्टरला पाणी मिळेल. पंपहाऊसचे व बंदिस्त नलिकांचे काम पूर्ण झाल्यावर दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची देगाव उपसा सिंचन योजना आता पूर्णत्वाकडे जात आहे. देगाव परिसरातील रेल्वे रुळावरील जलसेतूचे काम १४ वर्षांनंतर आता पूर्ण झाले आहे. सध्या देगाव शाखा कालव्याचे २८ किलोमीटर काम पूर्ण झाले असून तेथून पुढे होटगीच्या हद्दीत मोठे पंपहाऊस बांधले जात आहे. त्याठिकाणी पाणी आणून तेथून पुढे पाणी नेण्यासाठी बंकलगी व आहेरवाडीच्या शिवारापर्यंत बंदिस्त नलिका टाकण्यात आली आहे. ते पाणी बंकलगी-आहेरवाडीच्या हद्दीतील वितरण कुंडात आणले जाईल, त्याचेही काम सुरु आहे. वितरण कुंडावरुन पुढे सुमारे साडेदहा किमीच्या दोन बंदिस्त नलिकांद्वारे पाणी नेले जाणार आहे.

मुदत मार्चअखेर पण काम डिसेंबरपर्यंत होईल पूर्ण

एकरुख योजना आता कार्यान्वित झाली असून देगाव उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रात्यक्षिक देखील झाले आहे. आता होटगी हद्दीतील पंप हाऊसचे काम गतीने सुरु असून पुढच्या वर्षात या योजनेतून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी धरणाचे पाणी मिळणार आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर

बंदिस्त नलिकेला ठिकठिकाणी कनेक्शन

देगाव योजनेच्या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे, पण डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वास अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी व्यक्त केला आहे. पाच हजार व दहा हजार हेक्टर जमिनीला सहजपणे पाणी मिळेल, अशा दोन बंदिस्त नलिका देखील टाकल्या जात आहेत. त्या नलिकेला काही ठरावीक अंतरावर आऊटलेट (नळ कनेक्शन) सोडण्यात येणार असून त्याद्वारे त्या २२ हजार हेक्टरला पाणी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com