
सोलापूर : इन्स्टाग्रामवरून एक वर्षापूर्वी ओळख झालेला दिल्लीतील तरुण सहा महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटला. त्यानंतर आता ९ जूनला तिला न्यायला तो सोलापुरात आला होता. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्या त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्या तरुणाविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत ‘पोक्सो’सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अजनान ऊर्फ समीर मोहम्मद नसिम (वय १९, रा. दिल्ली) असे त्या संशयिताचे नाव आहे.
इनस्टाग्रामवर रिल्स बनविणारी ती अल्पवयीन मुलगी सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे. समीर हा देखील रिल्स स्टार असून, त्या दोघांची वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवरच ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले. समीर त्या अल्पवयीन मुलीला विवाहासाठी आग्रह करीत होता. विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो, असेही तो तिला म्हणाला होता. पण, ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती. त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापुरातून दिल्लीला न्यायचे म्हणून समीर रेल्वेने ९ जून रोजी सोलापूर शहरात आला होता. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये तो थांबला. दररोज ते दोघेही बाहेर फिरायला जात होते.
सामाजिक कार्यकर्त्यांनी ११ जून रोजी त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तपास करून त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेणे, लग्नासाठी जबरदस्ती करून पळवून नेणे, लैगिंक छळ (पोक्सो) अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत (शनिवारपर्यंत) पोलिस कोठडी ठोठावली आहे. उद्या (शनिवारी) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुलीनेच त्याला दिले ४००० रुपये
त्या तरुणाला अल्पवयीन मुलीला पळवून आणण्यासाठी कोणी पैसे दिले का? याचा शोध पोलिसांनी घेतला. मात्र, तसा कोणताही प्रकार आढळला नाही. उलट, त्या मुलीनेच त्या तरुणाला चार हजार रुपये खर्चासाठी दिल्याची बाब तपासात समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.