कोरोनामुळे अनेक बालके अनाथ ! वर्षभरात 592 दत्तक; "हे' आहेत दत्तक घेण्याचे नियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

adoption of children

कोरोना विषाणूने अनेक बालकांना अनाथ केले असून, त्या निराधारांना दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांकडून मागणी होत आहे. 2020-21 मध्ये देशांतर्गत 507 तर देशाबाहेर 85 मुलांना दत्तक देण्यात आले आहे.

कोरोनामुळे बालके अनाथ! 592 दत्तक; हे आहेत दत्तक घेण्याचे नियम

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना (Covid-19) विषाणूने अनेक बालकांना अनाथ (Orphan) केले असून, त्या निराधारांना दत्तक (Adopt) घेण्यासाठी इच्छुक पालकांकडून मागणी होत आहे. 2020-21 मध्ये देशांतर्गत 507 तर देशाबाहेर 85 मुलांना दत्तक देण्यात आले आहे. मागील साडेचार महिन्यांत दत्तक मुलांसाठी राज्यातून दोन हजार 25 पालकांनी फोनवरून चौकशी केल्याची माहिती "सारा'च्या (महाराष्ट्र राज्य दत्तकविधान संस्था) (Maharashtra State Adoption Institute) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (Demand for adoption of children orphaned by corona)

हेही वाचा: पीएम किसान योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर

अनाथ व गरजू बालकांना हक्‍काचे घर मिळावे, यासाठी केंद्रीय स्तरावर "कारा' तर महाराष्ट्रात "सारा'तर्फे संपूर्ण प्रक्रिया राबविली जाते. ऑगस्ट 2015 पासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य दत्तकविधान संस्थेच्या माध्यमातून राज्यातील इच्छुक पालकांना निकष पाहून त्यांना मुलं दत्तक दिले जाते. राज्यातील विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रातून दत्तक मुलांसाठी सर्वाधिक नोंदणी केली जात आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मुलांपेक्षा मुली दत्तक घेण्याची मानसिकता रुजल्याचेही चित्र पाहायला मिळत असल्याचेही "सारा'कडून सांगण्यात आले. मागील आठ ते दहा महिन्यांत महाराष्ट्रासह परदेशातील "आफा' संस्थेच्या माध्यमातून अमेरिका, युरोपमधूनही दत्तक मुलांची मागणी वाढली आहे. परंतु, पालकांची पात्रता पाहून त्यांना मुलं दत्तक देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: बेड न मिळाल्याने कोरोना ड्यूटीवरील शिक्षकाच्या आईचा मृत्यू !

अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी मागणी वाढली असून मागील वर्षभरात 592 बालकांना दत्तक देण्यात आले आहे. कोरोना काळात अनेक बालके अनाथ झाली असून, त्यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. कायदेशीर प्रक्रिया न करता दत्तक मुलं घेणाऱ्यांवर वॉच ठेवला जात असून, टास्क फोर्सच्या माध्यमातून अनाथ मुलांचा राज्यभर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.

- अब्राहम हेगडे, कार्यक्रम व्यवस्थापक, सारा, महाराष्ट्र

राज्यातील दत्तक मुलांची सद्य:स्थिती

  • पालकांचे अंदाजित अर्ज : 2,927

  • दत्तक संस्थांमधील बालके : 251

  • 2020-21 मधील दत्तक दिलेली मुले : 592

  • दररोज चौकशीचे कॉल : 12 ते 15

मूल दत्तक घेण्याचे निकष...

  • स्वत:बरोबरच त्या मुलाच्या गरजा भागवेल, त्याच्या भविष्याचा विचार होईल, एवढे असावे पालकांचे उत्पन्न

  • विवाहानंतर त्या दाम्पत्याचे वैवाहिक जीवन किमान दोन वर्षे आनंदी असावे

  • दोन्ही पालकांच्या वयाची बेरीज 90 पेक्षा कमी असल्यास 0 ते 4 तर वयाची बेरीज 100 पर्यंत असल्यास 4 ते 8 वर्षाचे बालक मिळते दत्तक

  • दोन्ही पालकांच्या वयाची बेरीज 110 असेल तर त्यांना 8 ते 18 वर्षांचे बालक मिळते दत्तक

  • एकटा पुरुष असल्यास त्यास केवळ मुलगा तर महिला असल्यास तिला मुलगी दत्तक घेता येईल

loading image
go to top