महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात होणार लोकशाही दिन - तहसिलदार अभिजीत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangola Tahsildar Abhijit Patil

सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या अडी-अडचणी स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सांगोला तहसील कार्यालय येथे लोकशाही दिन होणार आहे.

महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात होणार लोकशाही दिन - तहसिलदार अभिजीत पाटील

सांगोला - तालुक्यातील नागरिकांच्या अडी-अडचणी स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सांगोला तहसील कार्यालय येथे लोकशाही दिन होणार आहे. या दिवशी तालुक्यातील सर्वच विभागाचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित राहतील. नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होवुन आपल्या समस्या मांडाव्यात मांडाव्यात असे आवाहन सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत सावर्डे - पाटील यांनी केले आहे. 

याअगोदर ज्या विभागाशी संबंधित आपल्या अडचणी किंवा आक्षेप आहेत त्याबाबत पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. जिल्हास्तरावर असलेल्या वरिष्ठ कार्यालयातून नागरिकांनी केलेला व्यवहार संबंधित कार्यालयातून पुन्हा तालुकास्तरीय कार्यालयात येण्यासाठी बराचसा वेळ जात होता. दरम्यानच्या काळात स्थानिक नागरिकांना प्रवासाचा व अन्य त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या सूचनेनुसार सांगोला तहसील कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करून यामध्ये तालुक्यातील नागरिकांच्या ज्या विभागाशी संबंधित अडचणी किंवा समस्या असतील त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.  सोमवार (ता. 19) पासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल  तरी नागरिकांनी यामधे सहभागी व्हावे असेही शेवटी तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

या लोकशाही दिना दिवशी प्रशासनातील सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात मांडाव्यात. प्रशासनाकडून कोणत्याही विभागातील आलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.

- अभिजीत सावर्डे-पाटील, तहसीलदार, सांगोला.

लम्पी रोगाला रोखण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

राज्यात लम्पी रोगाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. राज्यातील लाखो जनावरांना याची लागण झाली आहे. परंतु सुदैवाने याची सांगोला तालुक्यातील एकाही जनावरांना लागण झाली नाही. आपल्या तालुक्याच्या बाहेर असलेला हा भयानक रोग बाहेरच रोखून धरण्यासाठी यासाठी मा. तहसिलदार अभिजीत पाटील यांचे अध्यक्षतेखाली तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अस्लम सय्यद यांनी शासकीय पशुवैद्यकिय डॉक्टर आणि खाजगी पशुसेवा दाते यांचे संयुक्त रित्या आढावा बैठक घेण्यात आली. लम्पी रोगाला रोखण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे असे आदेश तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Democracy Day Held On Third Monday Of Month At Tehsil Office Abhijit Patil Sangola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sangolaDemocracyTahsildar