मोहोळ तालुक्‍याला "डेंटल फ्लोरोसीस'चा विळखा ! का होतो हा आजार?

मोहोळ तालुक्‍याला डेंटल फ्लोरोसीस या आजाराचा विळखा
Dental fluorosis
Dental fluorosisCanva
Summary

डेंटल फ्लोरोसीसचा धसका विवाहयोग्य युवक-युवतींमध्ये बसला आहे. कारण, सौंदर्यात भर घालण्याचे मोठे काम दात करतात.

मोहोळ (सोलापूर) : कोरोना (Covid-19) संकट काळात सध्या मोहोळ तालुक्‍यातील पाच गावांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. खास करून युवक- युवतींमध्ये या रोगाचा धसका बसला आहे. डेंटल फ्लोरोसीस (Dental fluorosis) असे या आजाराचे नाव असून, मोहोळ (Mohol) तालुक्‍यातील पाच गावातील नागरिकांसह युवक- युवतींना या आजाराने विळखा घातला आहे. याचा सर्वांत जास्त फटका तरुण युवक- युवतींना बसत आहे. त्यासाठी दातांच्या दवाखान्यात (Drntal Clinic) हजारोंचा खर्च होऊ लागला आहे. (Dental fluorosis disease spread to Mohol taluka)

पायी वारीच करण्याची वारकऱ्यांची भूमिका ! यंदा वाद पेटणार

का होतो डेंटल फ्लोरोसीस?

मोहोळ तालुक्‍यात सध्या बागायती क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक गावात व शेतात बोअरचे पाणी पितात. विहिरीचे पाणी फार कमी जणांच्या पिण्यात येते. बोअरच्या पाण्यात विहिरीतील पाण्यापेक्षा जास्त क्षार असतात. त्याचा सर्वांत अगोदर फटका दातांना बसतो. दात किडणे, पिवळ्या पट्ट्या येणे, तुकडे उडणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. दात व दाढा किडल्याने वेदना निर्माण होतात, त्यामुळे अन्न खाता येत नाही, दातांचे तुकडे उडाल्यामुळे व ते पिवळे पडल्यामुळे अन्न नीट चावता येत नाही. त्याचा परिणाम अन्नपचनावर होतो. त्यामुळे आरोग्य बिघडते.

Dental fluorosis
कशी रोखणार तिसरी लाट? महापालिकेकडे अवघे चारच बालरोगतज्ज्ञ

दाढ व दात किडल्यामुळे ते काढून टाकावे लागतात किंवा ते वाचवायचे असतील तर त्यावर चांदीची कॅप बसवावी लागते. त्यासाठी एकावेळी किमान साडेतीन ते चार हजार रुपये खर्च येतो. याचा फटका विवाहयोग्य झालेल्या युवक व युवतींना बसत आहे. कारण, आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे मोठे काम दात करतात. विवाहासाठी युवतीला एखादे स्थळ आले व त्यांनी दातांची अवस्था पाहिली तर नकार येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मात्र कॅपचा इलाज हा तात्पुरत्या स्वरूपात असतो. दीर्घकाळ टिकेल असे सांगता येत नाही. तालुक्‍यातील खवणी, पोखरापूर, यावली, पापरी, पेनूर या भागातील नागरिकांना या आजाराने विळखा घातला आहे.

बोअरच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे दातांची अशी अवस्था होते. किडलेले दात वाचवायचे असतील तर कॅप करणे हा एकमेव पर्याय आहे. कारण, दात किंवा दाढ काढणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. दिवसाला असे सहा ते सात रुग्ण येतात. शक्‍यतो विहिरीचे व शुद्ध पाणी प्यावे.

- डॉ. अविनाश राऊत, दंतरोग तज्ज्ञ मोहोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com