पी.एम. किसान नव्या नोंदणीसाठी मंगळवेढ्यात टोलवाटोलवी

पी.एम.किसान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून महसूल व कृषी खात्याकडून टोलवाटोलवी होत असल्याने अनुदानासाठी पात्र असलेले शेतकरी वंचित राहिले असून वंचित शेतकऱ्याकडून संताप व्यक्त केला
Department of Agriculture PM Kisan new registration farmer issue in solapur
Department of Agriculture PM Kisan new registration farmer issue in solapurgoogle

मंगळवेढा : पी.एम.किसान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून महसूल व कृषी खात्याकडून टोलवाटोलवी होत असल्याने अनुदानासाठी पात्र असलेले शेतकरी वंचित राहिले असून वंचित शेतकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. वार्षिक 8000 हजार रू शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणाय्रा या योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅक पासबुक व आधार सातबारा जोडून महसूल खात्याकडे अर्ज करावा लागत होता.सुरूवातीच्या तलाठी स्तरावर नोंदणी केली. या महत्त्वपूर्ण योजनेत महसूल खात्याने योग्य पडताळणी नमस्कार केल्यामुळे अपात्र व आयकर भरणाय्रा शेतकऱ्यांनी घुसखोरी केली.

चौकशी अंती जवळपास 2200 अधिक शेतकऱ्याना घेतलेले अनुदान परत करण्याच्या नोटीसा दिल्या. त्यामधील काहीनी ते अनुदान परत देखील केले.मात्र अजूनही काही लाभार्थी पैसे भरले नाही त्यावर कारवाईचा बडगा उगारला नाही.दरम्यान केंद्रांने केवायसी करण्याचा नियम आणला तरीही केवायसी न केलेल्या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरही अनुदान जमा केले.सध्या नोंदणीसाठी काही शेतकऱ्याचे अर्ज तहसीलकडे पडून आहेत.त्यामधील काही शेतकऱ्याकडून नोंदणीच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या तक्रारी असून तालुक्याच्या सीमावर्ती भागातून नव्याने नोंदणी व चौकशीसाठी हेलपाट्या ने त्रस्त व्हावे लागत आहे.तहसीलमधील कर्मचाऱ्याकडून योग्य मार्गदर्शन होते नाही.सातत्याने हेलपाटे मारल्यावर साईट बंद आहे नाही.नाहीतर सर्वर डाऊन आहे.नाहीतर आता नोंदणी कृषी खात्याकडून होणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.कृषी खाते आमच्याकडे नोंदणीचा युझर आयडी व पासवर्डच नसल्याचे सांगून परत पाठवले जात आहे.

कृषी व महसूलच्या टोलवाटोलवीत सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे.बुडलेल्या अनुदानाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल विचारला जात आहे.शेतकय्राना होत असलेल्या त्रस्त सेवेबाबत लोकप्रतिनिधींकडून देखील विचारणा होणे अपेक्षित आहे.परंतु या कार्यालयातील मनमानीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शेतकरी सध्या मिळणाय्रा अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे.

कृषी व महसूल खात्याच्या कार्यालयात नवीन नोंदणीसाठी होत असलेल्या टोलवाटोलवीने वंचित शेतकऱ्याना हेलपाट्याने त्रस्त असून नवीन नोंदणीची स्वतंत्र प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अन्यथा शेतकऱ्यासोबत आंदोलन करू

- राकेश पाटील,ता.उपाध्यक्ष,प्रहार शेतकरी संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com