"ज्ञानोबा तुकाराम"च्या गजरात सोलापूरच्या दिंड्यांचे पंढरीकडे प्रस्थान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"ज्ञानोबा तुकाराम"च्या गजरात सोलापूरच्या दिंड्यांचे पंढरीकडे प्रस्थान!

"ज्ञानोबा तुकाराम"च्या गजरात सोलापूरच्या दिंड्यांचे पंढरीकडे प्रस्थान!

sakal_logo
By
श्याम जोशी

दक्षिण सोलापूर : कार्तिकी वारीसाठी सोलापूर शहरातून मेघश्‍याम घनश्‍याम व श्रीसंत तात्या महाराज कासेगावकर देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ तसेच रामकृष्णहरी सांप्रदायिक भजनी मंडळांच्या पायी दिंड्यांनी आज (ता. 11) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यामध्ये सुमारे 200 वारकरी सहभागी आहेत.

जुनी पोलिस लाईनमधील विठ्ठल मंदिरातून मेघश्‍याम घमश्‍याम व श्रीसंत तात्या महाराज कासेगावकर देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळाच्या दिंडीचे सकाळी नऊ वाजता प्रस्थान झाले. अखिल भाविक वारकरी मंडळाचे कोषाध्यक्ष किसनबापू कापसे यांच्या हस्ते वीणापूजन करण्यात आले. यावेळी कासेगावचे ग्रामपंचायत सदस्य रामहरी चौगुले, श्‍याम महाराज जोशी, विणेकरी नरसू महाराज पाटील, सागर महाराज सुतार, दिंडीचालक नागनाथ पवार, गजेंद्र ननवरे, अर्जून हुडकर, नागनाथ शिंदे, तानाजी हेडे, मच्छिंद्र माळी, सुधाकर शिंदे, तुकाराम कारभारी, विष्णू चौगुले, श्‍याम चौगुले, विठ्ठल येणगुरे, विठोबा हेडे, चोपदार खंडू क्षिरसागर, विठ्ठल वाघमारे, अक्षय खारे, चैतन्य वाडकर, श्रीमंत कोले, सुरज चौगुले, उमेश चौगुले, सतिश कदम, दिगंबर हेडे, कुबेर चौगुले उपस्थित होते. या दिंडीसोबत कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील सुमारे शंभर महिला व पुरुष वारकरी सहभागी आहेत.

हेही वाचा: Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

देगाव रोडवरील लक्ष्मी नगरातून रामकृष्णहरी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या दिंडीचे अनंतमहाराज ढेरे यांच्या हस्ते वीणापूजनाने प्रस्थान झाले. यावेळी हभप मनोज महाराज खलाटे, बाळू शिंदे, रामकृष्ण सुरवसे, श्रीकांत भोसले, बापू लामकाने, गणेश ढेरे, युवराज घाडगे, माऊली पाटील, विठ्ठल पौळ उपस्थित होते. यामधे हगलूर, वडजीसह शहरातील पाटील वस्ती, जुनी पोलिस लाईन व अन्य भागातील महिला व पुरुष वारकरी सहभागी आहेत.

या दोन्ही दिंड्या तिर्हेमार्गे तीन दिवसाची पायी वाटचाल करून दशमीला रविवारी (ता. 14) पंढरपूरात पोचणार आहेत. सोमवारी (ता. 15) कार्तिकी एकादशीचा सोहळा असल्याने चंद्रभागा स्नान, प्रदक्षिणा होऊन भजन किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. 16) या दिंड्या पंढरपूरहून परत सोलापूरकडे पायी वाटचाल करत निघणार आहेत.

loading image
go to top