esakal | आधी बागेतल्या आंब्याबद्दल तर आता कोरोनाबद्दल भिडे बोलले, त्यावर अजित पवार म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Bhide_Pawar

सांगली येथील व्यापाऱ्यांनी लॉकडाउन विरुद्ध आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला. या वेळी त्यांनी कोरोना हा मुळी रोगच नसल्याचे विधान करून, कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत, असे वक्तव्य केले. 

आधी बागेतल्या आंब्याबद्दल तर आता कोरोनाबद्दल भिडे बोलले, त्यावर अजित पवार म्हणाले...

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : या माणसाने आधी बागेतल्या आंब्याबद्दल वक्तव्य केलं होतं. आता कोरोनाबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धीचाच प्रकार आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर लगावला. 

सांगली येथील व्यापाऱ्यांनी लॉकडाउन विरुद्ध आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला. या वेळी त्यांनी कोरोना हा मुळी रोगच नसल्याचे विधान करून, कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत, असे वक्तव्य केले. एवढंच नव्हे तर मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला? मास्क लावण्याची काहीही गरज नाही, असे खळबळजनक वक्तव्ही त्यांनी केले. 

इतक्‍यावरच न थांबता ते म्हणाले, प्रत्येकाला स्वतःच्या जिवाची काळजी आहे. त्यामुळे तो काळजी घेतो. लॉकडाउन विरोधात लोकांनी बंड करायला हवा आणि अशा नियम करणाऱ्या शासनाला फेकून द्यायला पाहिजे. 

भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या वेळी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याप्रकरणी बोलताना, संभाजी भिडे यांचे वक्तव्य तपासून कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या माणसाने आधी बागेतल्या आंब्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यात आता केलेलं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धीचा प्रकार आहे. नेमकं वक्तव्य तपासून या प्रकरणी कारवाई करू. 

loading image