
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार ता. ३ पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ९.३० वाजता मुंबईतून ते विमानाने सोलापूरकडे निघणार आहेत. सोलापुरातून ते १०.४५ वाजता हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे जाणार आहेत.