
सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे आणि भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन या निवडणुकीत पुढाकार घेतलेले आमदार सुभाष देशमुख आज वडाळ्यात (ता. उत्तर सोलापूर) भेटले. आमदार देशमुखांनी बाजार समितीच्या निवडणुकीत ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ची रणनीतीचा अवलंब केल्याचे दिसते.