esakal | संकटातही त्यांनी केळी निर्यातीला मिळवले वाढते दर
sakal

बोलून बातमी शोधा

keli.jpg

सोलापूर जिल्ह्यात कंदर हे गाव केळी उत्पादनात अग्रेसर आहे. येथील केळी देशांतर्गत बाजारपेठ आणि देशाबाहेर निर्यात होते. मार्चपासून देशाबाहेर केळी निर्यात बंद असल्याने केळीचा दर कमी झाला होता. कंदर येथील रंगनाथ शिंदे प्रगतशील केळी उत्पादक शेतकरी निर्यातदार म्हणून ओळखले जातात. 
कंदर भागातील सुमारे 150 शेतकरी सभासद असलेली जोतिर्लिंग ही शेतकरी उत्पादक कंपनी त्यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. 

संकटातही त्यांनी केळी निर्यातीला मिळवले वाढते दर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कंदर(सोलापूर)ः येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने लॉकडाउनच्या संकटात देखील केळी निर्यातीला दर वाढवून देण्याची कामगिरी केली आहे. कोरोना मुळे झालेली केळीच्या दराची पडझड भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. 

हेही वाचाः पोलिसांच्या तत्परतेने माळढोक पक्ष्यास जीवनदान 

सोलापूर जिल्ह्यात कंदर हे गाव केळी उत्पादनात अग्रेसर आहे. येथील केळी देशांतर्गत बाजारपेठ आणि देशाबाहेर निर्यात होते. मार्चपासून देशाबाहेर केळी निर्यात बंद असल्याने केळीचा दर कमी झाला होता. कंदर येथील रंगनाथ शिंदे प्रगतशील केळी उत्पादक शेतकरी निर्यातदार म्हणून ओळखले जातात. 
कंदर भागातील सुमारे 150 शेतकरी सभासद असलेली जोतिर्लिंग ही शेतकरी उत्पादक कंपनी त्यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. 

हेही वाचाः सोलापूरचा पारा 44.2 अंश सेल्सिअसवर 

दरवर्षी ते परिसरातील शेतकऱ्यांकडील केळी आखाती देशांत निर्यात करतात. परंतु कोरोना लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर मार्चपासून देशासह राज्यातही संपूर्ण राज्यात लॉकडाउन सुरू झाले आणि केळी निर्यात साखळी अडचणीत आली होती. रमजानच्या महिन्याची सुरवात झाल्याने आखाती देशांकडून केळीला मागणी वाढत होती. निर्यात प्रक्रिया कोलमडली होती. त्यातच संकटात भर म्हणून स्थानिक बाजारपेठेत लॉकडाउनमुळे केळी तीन ते चार रुपये किलो झाली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. निर्यातीसाठी केलेल्या प्रयत्नामूळे किलोला सहा रुपये दर तर नंतर हा दर आठ रुपयापर्यंत पोचला. 
लॉकडाउनच्या काळात केळी उत्पादक रंगनाथ शिंदे यांनी संकटांशी सामना करण्याचे ठरवले. उजनी बॅक वॉटर या केळी पट्ट्यातील शेतकरी, जिल्हा, तालुका कृषी विभाग, निर्यात कंपनीचे अधिकारी, कृषिभूषण आनंद कोठाडिया यांचे मार्गदर्शन आणि आखाती देशांतील खरेदीदार यांच्यासोबत वेळोवेळी संपर्कात राहून निर्यात प्रक्रिया सुकर करण्याचे प्रयत्न केले. निर्यातीसाठी केलेल्या प्रयत्नामूळे किलोला सहा रुपये दर तर नंतर हा दर आठ रुपयापर्यंत पोचला. अजूनही भाव वाढवून मिळावा असा प्रयत्न आहे. 


शेतकऱ्यांना समाधानकारक दर 
कोरोना संकटाने शेतकऱ्यांना केवळ दोन ते तीन रुपये दर मिळत होता. अशावेळी निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला. निर्यातीसाठी किलोला सहा रुपये दर मिळाला. नुकताच तो आठ रुपयांवर गेला. किलोला किमान चार रुपये शेतकऱ्यांना जास्तीचे दर मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. 
- रंगनाथ शिंदे, केळी निर्यातदार, कंदर ता.करमाळा 

loading image
go to top