Solapur: पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक शहरांमध्ये रिक्षांची संख्या भरमसाट वाढत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक सार्वजनिक परिवहन व्यवस्था मोडकळीस येऊ लागली आहे. .दुसरीकडे वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे प्रवासाचा वेळ वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षांचे परमीट बंद तथा त्यावर निर्बंध घालण्यासंदर्भात संबंधित आरटीओंकडून ‘परिवहन’ला प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, रिक्षांचे परमीट बंद करण्याचा अधिकार कोणाला, केंद्राला की राज्याला यातच तो निर्णय अडकला आहे.सोलापूर शहरातील रस्त्यांवर दररोज सुमारे ३० हजार रिक्षा धावतात. शहरातील अनेक रोडवर, चौकाचौकात अस्ताव्यस्तपणे रिक्षा थांबलेल्या दिसतात. स्मार्ट सिटीत एकाच ठिकाणी २०० ते ५०० चारचाकी वाहने थांबू शकतात, अशी महापालिकेची कोठेही पार्किंगची सोय नाही. त्यामुळे चारचाकी वाहने, दुचाकी रस्त्यावरच थांबविली जातात. .Solapur District Milk Union: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संकटात 'तीन-तेरा', संचालक मंडळावर बरखास्तीचा ठपका.अशा बेशिस्त वाहतुकीमुळे सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. सीएनजी, एलपीजी व पेट्रोल-डिझेलवरील रिक्षा सध्या शहरातून धावतात. दरमहा एकट्या सोलापूर शहरात जवळपास १०० रिक्षा वाढत आहेत. दहा वर्षांत १२ ते १४ हजार रिक्षा वाढल्याची नोंद ‘आरटीओ’कडे आहे. अन्य शहरांमधील स्थिती देखील अशीच आहे. या पार्श्वभूमीवर तेथील उपप्रादेशिक व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रिक्षांचे खुले परमीट बंद करण्याचे प्रस्ताव मागच्या दोन वर्षापूर्वीच दिले आहेत..सरकारच्या विधी व न्याय विभागालाच सापडेना उत्तररिक्षांचे खुले परमीट बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला, याचे उत्तर अजूनही सरकारच्या विधी व न्याय विभागाला सापडलेले नाही. राज्य सरकारकडून सांगितले जाते की हा अधिकार केंद्रीय वाहतूक विभागाला आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून तसा निर्णय होतो, असे केंद्राचे म्हणणे आहे. यात परिवहन विभागाने वारंवार सरकारला तथा सरकारच्या विधी व न्याय विभागाला पत्रव्यवहार केला मात्र, त्यावर काहीही निर्णय झालेला नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले..राज्यातील अनेक शहरांमध्ये रिक्षांची संख्या प्रचंड वाढू लागली असून त्या शहरांमधील आरटीओ अधिकाऱ्यांकडून परमीट बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव देखील प्राप्त आहेत. त्यानुसार सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यावर विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा अपेक्षित आहे.- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.