लॉकडाउनचा बट्ट्याबोळ ! आरोग्य यंत्रणेची दमछाक

लॉकडाउन असूनही शहरात गर्दी कमी होताना दिसत नाही
Solapur
SolapurCanva

सोलापूर : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली, रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या, कोरोनाच्या चाचण्या (Corona Test) वाढविण्यात आल्या, जनजागृतीवर भर दिला गेला; तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख उच्चांकीच आहे. यामध्ये अनेकांना कोरोनाची (Covid-19) लागण देखील झाली आहे. तरीही अजून सर्वसामान्य लोकांमध्ये गांभीर्य नाही, अशी स्थिती दिसत आहे. (Despite the lockdown, the city does not seem to be getting crowded)

Solapur
अकरावी प्रवेशासाठी सीईटी ! शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र समिती

एप्रिल महिन्याच्या 30 दिवसांत रोज 500 च्यापुढे कोरोना बाधितांची संख्या होती. एप्रिल आणि मे महिन्यांत कोरोना संसर्ग वाढल्याने आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाल्याचे दिसून आले. शहर व जिल्ह्यातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य यंत्रणा या तीनही माध्यमातून आणि त्या त्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर मोठा भर दिला जात आहे. मात्र तरीही अजून रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही. अनेक गावांमध्ये कडक अंमलबजावणी केली जात आहे. शहरी भागात मात्र नियमांचा पूर्णतः बट्ट्याबोळ दिसून येत आहे.

Solapur
कोरोना ड्यूटी नाकारणारे शिक्षक बिनपगारी !

संसर्ग हेच कोरोना वाढीचे एकमेव कारण असल्याने संचारबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला. लोक एकमेकांच्या कमी संपर्कात येणे, हाच या संचारबंदीचा मुख्य उद्देश होता. मात्र आठ दिवसांची कडक संचारबंदी संपली तरी देखील नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य समजेनासे झाले आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडावे, अशी त्यात सवलत असून, सकाळी 11 वाजेपर्यंत भाजीपाला किंवा जीवनावश्‍यक गोष्टींच्या खरेदीसाठी मुभा आहे. मात्र रोज या वेळेत आणि या वेळेनंतरही लोकांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. भाजी खरेदीसाठी रोज इतक्‍या प्रमाणात होणारी गर्दीही अनाकलनीय वाटावी, अशीच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी आता पोलिस यंत्रणा अधिक सतर्कतेने रस्त्यावर उतरली आहे. पोलिस स्वत: बाजारपेठेत फिरून लक्ष ठेवून आहेत.

लोकांकडून सहकार्य अपेक्षित

आरोग्याच्या वाढलेल्या सुविधा आणि त्यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण निश्‍चित झाल्यानंतरचे आहेत. रुग्ण कमी व्हावेत, यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. मुळात तेथेच अजूनही सोलापूर जिल्हा कमी पडत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लोकांकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते अजूनही मिळत नाही, हे रस्त्यावरच्या रोजच्या गर्दीवरून दिसत आहे. रात्रीच्यावेळी अनेक लोक शतपावलीसाठी रस्त्यावर येत असल्याचे चित्रही सोलापूर शहरात दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही, महिला, मुले, घरातील ज्येष्ठ मंडळी रात्री रस्त्यावर शतपावली घालताना दिसतात. त्यांना कोरोनाची गंभीरता अजूनही कळालेली दिसून येत नाही.

बातमीदार : वेणुगोपाळ गाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com