'आमदार पडळकरांना संरक्षण द्या; भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरणारे नाही!'

'आमदार पडळकरांना संरक्षण द्या; भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरणारे नाही!'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसSakal
Summary

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्यांबाबत आवाज उठवत आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही ते सहन करणार नाही.

पंढरपूर (सोलापूर) : आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे राज्य सरकारच्या (State Government) घोटाळ्यांबाबत आवाज उठवत आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही ते सहन करणार नाही. राज्य सरकारने आमदार पडळकर यांना तत्काळ संरक्षण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पंढरपुरात केली.

आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर काल सांगलीतील आटपाडी तालुक्‍यात हल्ला झाला होता. या हल्ल्याचा देवेंद्र फडणीस यांनी निषेध करत राज्य सरकारने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकार भाजप कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या अशा धमक्‍यांना आम्ही घाबरणार नाही. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. या वेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com