तंबाखूमुक्त शाळा होणारे देवगाव केंद्र राज्यात पहिले

भारत सरकारच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या नऊ निकष या शाळांनी पुर्ण केले.
tobacco free school
tobacco free schoolEsakal

पांगरी (सोलापूर) : शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू विरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या तंबाखू नियंत्रण विभाग व सलाम फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या तंबाखूमुक्त शाळा अभियानात देवगाव केंद्राने बाजी मारत केंद्रातील 13 शाळा तंबाखूमुक्त होणारे राज्यातील एकमेव देवगाव केंद्र बनले आहे.

भारत सरकारच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या नऊ निकष या शाळांनी पुर्ण केले. केंद्रातील नागोबाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जाधव, केंद्रप्रमुख धनाजी जाधवर, गणेश खडके यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी केंद्रातील 13 शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना दोन वर्षासाठीचे तंबाखूमुक्त शाळेचे डिजिटल प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

तंबाखूमुक्त शाळेसाठी सलाम फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, केंद्रप्रमुख धनाजी जाधवर यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पाठपुरावा करत असताना मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य लाभल्याने यश मिळविता आल्याचे केंद्रप्रमुख धनाजी जाधवर यांनी सांगितले.

तंबाखूमुक्त शाळा अभियानाकरिता नऊ निकष लावण्यात आले होते. शाळेच्या आवारात तंबाखूमुक्त परिसर म्हणून मोठा फलक लावणे, शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी, आवारात बिडी किंवा सिगारेटचे तुकडे, रिकामे पाऊच आढळून आले नाही पाहिजेत. भिंतीवर थुंकूणे याला प्रतिबंध असणे, असे दिसून आल्यास दंड आकारणे. तंबाखूच्या दुष्परिणाम आधारित पोस्टर किंवा शाळेत साहित्य विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत. शाळेत महिन्यात किमान एक तरी तंबाखू नियंत्रणावर आधारित कार्यक्रम आयोजित करणे. या अनुषंगाने गावात प्रभात फेरी काढणे. जागतिक कर्करोग दिन, तंबाखू विरोधी दिन साजरा करणे. रांगोळी स्पर्धाचे आयोजन करणे, तंबाखूमुक्तची शपथ देणे, राष्ट्रीय सणाच्या दिवशी तंबाखूमुक्ती मॉनिटर नियुक्त करणे, परिसरात तंबाखूचा वापर होणार नाही, याविषयी आचारसंहिता तयार करणे, विक्रीचे दुकान नसणे या अटी पुर्ण करणाऱ्या तंबाखूमुक्त शाळा म्हणून गौरव केला आहे.

यावेळी मुख्याध्यापक नवनाथ चौबे, विवेकानंद जगदाळे, रामलिंग जगदाळे, ओंकारेश्वर सालसकर, चंद्रकांत मिरगणे, महेश बरचे, दत्तात्रय पाटील, माया कोरे, शारदा कोंढरे, रणदिवे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com