
पंढरपूर : चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिराजवळ घडली. दर्शन नारायण कोलते (रा. न्हावी, ता. यावल, जि. जळगाव) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान एकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले.