Kolhapur devotee suffers fatal heart attack in ST bus while returning from Pandharpur Wari.
Kolhapur devotee suffers fatal heart attack in ST bus while returning from Pandharpur Wari.Sakal

Heart Attack: अन्‌ परतीच्या प्रवासात भाविकाला भेटला ‘विठ्ठल’; कोल्हापूरच्या भाविकाला एसटी बसमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका

Faithful’s Last Breath on Wheels: पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर सांगोला आगाराच्या सोलापूर-कोल्हापूर या एसटीने परतीच्या प्रवासास निघाले. सांगोल्यातून बाहेर पडल्यावर त्याच्या छातीत अचानक दुखू लागले. तेव्हा बस सांगोला आगारात आणण्यात आली. त्या प्रवाशासोबत कोणतेही नातेवाईक नसल्याने खूप मोठी अडचण निर्माण झाली.
Published on

-सुनील जवंजाळ

नाझरे: श्री विठ्ठल दर्शन घेऊन पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकाला एसटीमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान दाखवत चालक उत्तम ठोंबरे तत्काळ एसटी सांगोला आगारात परत आणली आणि तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीने एका भाविकांचे प्राण वाचले. पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला गेलो होतो. परंतु, परतीच्या मार्गावरच आपल्याला या कर्मचाऱ्यांच्या रूपाने विठ्ठल भेटला, अशी कृतार्थ भावना त्या भाविकाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com