

Chemical Preservation Work to Halt Pad Sparsh Darshan at Pandharpur
Sakal
पंढरपूर: येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. विधी व न्याय खात्याने तशी मंदिर समितीला परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये रासायनिक प्रक्रियेचा निर्णय घेतला जाईल. रासायनिक प्रक्रियेदरम्यान विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस बंद ठेवले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आज दिली.