
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी (ता. ६) भरवस्तीत असलेली एक धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याची मोठी घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन भाविक मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, पंढरपूर शहरातील धोकादायक इमारतीचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोकादायक इमारतीवर कारवाई करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.