Solapur News: 'गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी साईबाबा मंदिरात भक्तांचा सागर'; दहा हजार भाविकांनी घेतले दर्शन

Guru Purnima : गुरुपौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या मसालेभात, लापशी व आमटी यांचा नैवेद्य साईंना दाखवण्यात आल्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यास सुरवात झाली. दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी झाली होती.
Hotgi: A spiritual sea of over 10,000 devotees at Sai Baba Temple for Guru Purnima darshan.
Hotgi: A spiritual sea of over 10,000 devotees at Sai Baba Temple for Guru Purnima darshan.Sakal
Updated on

सोलापूर : होटगी येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. गुरुवारी साईंच्या चरणी जवळपास दहा हजार साईभक्त लीन झाले. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीच्या आरतीनंतर गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com