विठुरायाच्या भक्तांमध्येही कोरोनाची भिती 

Devotees retreat to Devadarshan for fear of corona
Devotees retreat to Devadarshan for fear of corona
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्रात आलेल्या कोरोना व्हायरसच्या भितीने भाविकांनी देवदर्शनाकडे पाठ फिरवली आहे. भाविकांची संख्या कमालीची घटल्याने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर देखील आज ओस पडल्याचे चित्र आहे. परिणामी येथील अनेक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस हे महामारीचे संकट असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरात त्याचे मोठे पडसाद उमटू लागले आहेत. कोरोना व्हायरसच्या भितीने आता राज्यभरातील भाविकांनी देवदर्शनाकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका साक्षात विठुरायालाही बसला आहे. 
राज्यभरातून विठ्ठल दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची गर्दी करत असते. आज मात्र श्री विठ्ठल मंदिर ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते. दररोज 
हजारो भाविकांची गर्दी असलेली दर्शबारी देखील आज रिकामी आहे. भाविकांना आता थेट गाभाऱ्यात जाता येत आहे. इतर वेळी दर्शनासाठी आठ ते दहा तासाचा अधवी लागतो. दरम्यान गर्दी कमी झाल्याने आता भाविकांना केवळ दहा मिनिटामध्ये दर्शन घेता येऊ लागले आहे. दररोज तुलनेत जवळपास 70 ते 80 टक्‍क्‍यांनी भाविकांची गर्दी कमी झाली आहे. 
दरम्यान, कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर समितीने स्वच्छतेच्या कामावर भर दिला आहे. मंदिर परिसरात कोरोना व्हायरसच्या संदर्भात जनजागृती करणारे फलक देखील लावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com