
-महेश पाटील
सलगर बुद्रुक: मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या सलगर बुद्रुक या गावांमध्ये चालू मानसून हंगामामध्ये पाऊस न पडल्याने शेती व शेतीवर आधारित असलेले उद्योगधंदे संकटात सापडले आहेत. खरिपाची सर्व पिके वाया गेल्यात जमा आहेत. जनावरांचा चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे श्रावण सोमवार निमित्त गावचे ग्रामदैवत नंदी बसवन्ना म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला व पाऊस व्हावा व गावातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी साकडे घालण्यात आले.