
पंढरपूर : येथील विठुरायाच्या चरणावर आषाढी यात्रा काळात अनेक भाविकांनी लाखो रुपयांचे दान अर्पण केले आहे. यामध्ये अहिल्यानगर येथील दोन भाविकांनी तब्बल एक कोटी १० लाख रुपये किमतीचा ८७ किलो वजनाचा चांदीने मढवलेला दरवाजा देवाला अर्पण केला आहे. गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर हे दान देवाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे. चांदीने मढवलेल्या दरवाजामुळे मंदिराची शोभा वाढली आहे.