
-सूर्यकांत बनकर
करकंब : यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर उल्हसित झालेल्या आणि सावळ्या विठुरायाच्या भेटीस आतुर झालेल्या वैष्णवजनांच्या गर्दीने आणि ते करत असलेल्या हरिनामाच्या गजराने सध्या पंढरीला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर भक्तीचा महापूर आल्याचे चित्र आहे.