शेटे वाड्यात श्री सिध्दरामेश्‍वरांच्या योगदंडाची भक्तीभावाने पूजा 

yogdand pooja.jpg
yogdand pooja.jpg

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्‍वराच्या यात्रेला 900 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असून, यातील विधींही तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. प्रारंभी अष्टविनायकांची पूजा झाली. त्यानंतर शेटे वाड्यात सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाची पूजा करण्याबरोबरच हिरेहब्बूंची पाद्यपूजा, महाप्रसाद वाटपाने या यात्रेतील धार्मिक विधींना रविवारी सुरवात झाली. हर्र बोला, हर्र... शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराज की जयच्या जयघोषात व संबळच्या निनादात हा विधी पार पडला. 

दुपारी बाराच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून योगदंड संबळच्या निनादात शेटे वाड्याकडे मार्गस्थ झाले. दुपारी एकच्या सुमारास योगदंडासह मानकरी व पुरोहित शेटे वाड्यात दाखल झाले. ऍड. रितेश थोबडे व त्यांची पत्नी श्रद्धा थोबडे यांनी योगदंडाची पूजा केली. हिरेहब्बूंच्या ताटातील एकेक घास अन्न काढून ते होममध्ये टाकून त्याचे हवन करण्यात आले. याचे पौरोहित्य सिद्धेश्वर कंठीकर, शिवशंकर कंठीकर, श्रीशैल कंठीकर, महांतेश कंठीकर यांनी केले. 
शिवयोगी सिद्धरामेश्‍वर बालपणी जनावर राखायचे. तेव्हा त्यांच्या हातात काठी असायची. हीच काठी आता योगदंड म्हणून ओळखली जाते. त्याला यात्रेत शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांचे प्रतीक मानले. त्याची पूजा करण्याची परंपरा ही फार मोठी आहे. याची पूजा करण्याचा मान आम्हाला मिळाल्याचे भाग्य आहे, असे ऍड. मिलींद थोबडे यांनी सांगितले. या पूजाविधीमध्ये ऍड. मिलिंद थोबडे, विजया थोबडे, सुचेता थोबडे, डॉ. मल्लिका थोबडे, ललिता थोबडे यांनीही सहभाग घेतला. योगदंडाची पूजा करण्याआधी पुरोहित कंठीकर यांनी सिद्धरामेश्‍वर तलाव व अन्य नद्यांतील पाण्याने योगदंडाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर अष्टगंध लावल्यानंतर नैवैद्य दाखविण्यात आला. शहरात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश असलेल्या भाज्या, पुरणपोळीचा नैवैद्यामध्ये समावेश होता. मानकऱ्यांसह भाविकांना शेटे वाड्यात प्रवेश करताना सॅनिटायझर, तापमानाची तपासणी करुनच आत सोडण्यात आले. मास्कही बंधनकारक करण्यात आले. दरवर्षी हजारो जणांना महाप्रसादाला आमंत्रण दिले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे निवडणक मानकरी व भाविकांना महाप्रसाद वाटप करुन परंपरेत खंड पडू नये, याची काळजी घेण्यात आली. 


पूजेच्या निमित्ताने केळवण 
लग्नापूर्वी केळवण (नीरगडगी) घालण्याची प्रथा आहे. शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्या लग्नाच्या आधी शेटेवाड्यात ते केळवणचे जेवण जेवले होते, अशी अख्यायिका आहे. ती परंपरा त्यांच्या यात्रेतील विवाह सोहळ्याआधी पार पाडली जाते. यावेळी मानकऱ्यांसह पुरोहित व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. 

आतापर्यंतचे मानकरी 
सुरवातीला मल्लिकार्जुन शेटे योगदंडाची पूजा करायचे. त्यानंतर 1986 पर्यंत रामचंद्र शेटे यांनी हा मान सांभाळला. 1986 ते 2013 पर्यंत ऍड. मिलिंद थोबडे यांनी ही परंपरा चालवली. 2013 नंतर ऍड. रितेश थोबडे यांच्याकडे हा मान सोपविण्यात आला.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com