

Political Balance Maintained: Dilip Mane to Join, Says State Congress President Chavan
Sakal
सोलापूर: माजी आमदार तथा बाजार समितीचे दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशाविरोधात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २८) मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, कोणावर अन्याय होणार नाही, याची ग्वाही त्यांना देतानाच माने यांचा प्रवेश होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.