
सोलापूर : शासनाच्या सर्व विभागांची सेवा आपले सेवा सरकार पोर्टलवर जोडण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. शासनाच्या सर्व सेवा आपले सेवा सरकार पोर्टलवरच उपलब्ध होतील. सद्यःस्थितीत राज्य शासनाच्या ९६९ सेवापैकी ५३६ सेवा ऑनलाइन उपलब्ध झालेल्या आहेत. उर्वरित सेवा ऑफलाइन पद्धतीने दिल्या जात आहेत. ऑफलाइन सेवाही लवकरच ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त डॉ. दिलीप शिंदे यांनी दिली.