Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

दिव्यांग मुलावरून पेटलेल्या जुन्या वादातून सुजित राठोडचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या देत मुख्य आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी
18-Year-Old Sujit Rathod Killed Over Dispute Involving Disabled Brother

18-Year-Old Sujit Rathod Killed Over Dispute Involving Disabled Brother

Sakal

Updated on

मंगळवेढा : दिव्यांग असल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तालुक्यातील बालाजी नगर येथे झालेल्या मारहाणीत 18 वर्षीय सुजित राठोड या तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेनंतर यातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करा या मागणीसाठी नातेवाईकांनी थेट मृतदेह पोलीस ठाण्यात आणला.माझ्या लेकराची काही चूक नाही. माझ्या लेकराला न्याय द्या असा टाहो मुलाच्या आईने पोलीस ठाण्यासमोर फोडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थ भावनावश झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com