विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!

विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!
विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!
विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना! Canva
Summary

आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार दिलीप माने या दोन नावांभोवतीच सोलापूरच्या विधानपरिषद निवडणुकीची चर्चा सध्या फिरत आहे.

सोलापूर : नगरसेवक अन्‌ झेडपी सदस्यांना मालामाल करणारी विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council elections) तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात सरकार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तर सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधानपरिषदेची जागा भाजपकडे (BJP) आहे. जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेली दानत, संख्याबळ आणि तगडा उमेदवार या तिन्ही गोष्टी सध्या भाजपकडे आहेत. राज्यात आपली सत्ता आहे, एवढाच प्लस पॉईंट राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (NCP) सध्या दिसत आहे. निवडणूक कधी होणार?, उमेदवार कोण असणार? याचा काहीच अंदाज लागत नसल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला (Politics) कलाटणी देणाऱ्या या निवडणुकीची रणनीती ठरताना दिसत नाही.

विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!
वर्षानंतरही शेतकऱ्यांना मिळेना भरपाई! 4246 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार दिलीप माने या दोन नावांभोवतीच सोलापूरच्या विधानपरिषद निवडणुकीची चर्चा सध्या फिरत आहे. लक्ष्मीपुत्राची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. सोलापूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवते तर दिलीप माने हे सध्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे उमेदवारीचा आणि जागेचा तिढा सुटणार कसा, हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे. महेश कोठे, तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला अद्यापही मुहूर्त लागताना दिसत नाही. त्यामुळे माने आणि राष्ट्रवादीची उमेदवारी हे समीकरण सुटणार कसे? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

1 जानेवारी 2022 रोजी परिचारक यांच्या आमदारकीची मुदत पूर्ण होत असल्याने साधारणत: डिसेंबरमध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया अपेक्षित आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी भाजप सध्या प्रचंड प्रबळ आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात आहे. शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्वपक्षीय संचालकांमधील सलोखा यामुळे मतदारांपर्यंत थेट कसे पोचायचे? याचाही मार्ग भाजपच्या नेत्यांना चांगला माहिती आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक भाजपसाठी सोपी मानली जाते. या निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, अशीच सध्याची तरी शक्‍यता दिसत आहे. भाजपकडून परिचारक यांचे नाव समोर आल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप माने यांच्यासारखा सर्वार्थाने तगडा उमेदवार मैदानात उतविला जाण्याची शक्‍यता आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!
निवडणुकीच्या घोषणेनंतर घटल्या 'डीसीसी'च्या ठेवी !

नगरसेवकांना चिंता 15 लाखांची

मोहोळ, माढा, माळशिरस नगरपरिषद/नगरपंचातीच्या सदस्यांची मुदत संपली, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेली. त्यामुळे या तिन्ही ठिकाणचे जवळपास 55 ते 60 नगरसेवक या निवडणुकीला मुकणार आहेत. अकलूज, नातेपुते, वैराग आणि श्रीपूर-महाळुंगला नगरपरिषद / नगरपंचायत झाली खरी, परंतु विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी येथून नगरसेवक निवडून येणे कठीण असल्याने येथीलही भावी नगरसेवकांचा चांगला चान्स हुकणार आहे. अनगर, टेंभुर्णी आणि करकंब नगरपंचायतीचा प्रस्ताव आता गेला आहे. त्यामुळे या नगरपंचायतींचाही फारसा लाभ विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी होण्याची शक्‍यता नाही. अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या नऊ नगरपरिषदांमधील नगरसेवकांची मुदत 30 डिसेंबर 2021 ला पूर्ण होत आहे. तत्पूर्वी, विधान परिषदेचे मतदान न झाल्यास 15 लाखांच्या बंपर लॉटरीला मुकावे लागते की काय? अशी चिंता या नऊ नगरपरिषदांमधील काही नगरसेवकांना लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com