भांडवली निधीसाठी होणार गाळे भाडेवाढ !

कामे होत नसल्याने सत्ताधाऱ्यांची नाराजी ! भांडवली निधीसाठी होणार गाळे भाडेवाढ
भांडवली निधीसाठी होणार गाळे भाडेवाढ !
भांडवली निधीसाठी होणार गाळे भाडेवाढ ! Esakal
Updated on

आतापर्यंत महापालिकेचे दोन महापौर, सभागृहनेते बदलले; तरीही प्रशासनाकडून सत्ताधारी नगरसेवकांची कामे होत नसल्याचे गाऱ्हाणे सत्ताधारी नगरसेवकांनी मांडले.

सोलापूर : आतापर्यंत महापालिकेचे दोन महापौर, सभागृहनेते बदलले; तरीही प्रशासनाकडून सत्ताधारी नगरसेवकांची कामे होत नसल्याचे गाऱ्हाणे अंदाजपत्रकीय सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी मांडले. महापालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शुक्रवारी (ता. 23) महापालिकेच्या 2021-22 मधील अंदाजपत्रकीय पार्टी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भूमी मालमत्तेचे अधीक्षक, मंडई अधीक्षक, उद्यान विभाग आणि कोंडवाडा विभाग, आरोग्याधिकारी, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य अभियंता, (पाणीपुरवठा ड्रेनेज), हुतात्मा स्मृती मंदिर, सुरक्षा अग्निशामक दल, अतिक्रमण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जनगणना व निवडणूक विभागासह अन्य विभागांच्या उत्पन्न व निधी खर्चाची माहिती घेतली. (Dissatisfaction has spread among the authorities in the corporation due to non-performance of works-ssd73)

भांडवली निधीसाठी होणार गाळे भाडेवाढ !
दोन डोस ठरले सुरक्षाकवच ! पहिला डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू

या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम (Mayor Srikanchana Yannam), सभागृहनेते शिवानंद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, माजी सभागृहनेते श्रीनिवास करली, उपायुक्त एन. के. पाटील, ज्येष्ठ नगरसेवक मल्लिकार्जुन कावळे, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक सुभाष शेजवाल, नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले, नगरसेवक रवी कय्यावाले, नगरसेविका मेनका राठोड, नगरसेवक राजकुमार हंचाटे, मुख्यलेखापाल शिरीष दनवे, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक नारायण बनसोडे, नगरसेविका स्वाती आवळे, नगरसेविका जुगनूबाई आंबेवाले, नगरसेविका निर्मला तांबे, संगीता जाधव आदी उपस्थित होते.

भांडवली निधीसाठी होणार गाळे भाडेवाढ !
युवकाचं मुख्यमंत्र्यांना ट्‌वीट! वाचले महापुरातील पंधराजणांचे प्राण

गाळे भाडेवाढ नाही, तर उत्पन्न कसे वाढणार?

अंदाजपत्रकीय सभेत भूमी मालमत्ता, मंडई अधीक्षक, उद्यान विभागामध्ये बैठकीत शहरातील एकूण गाळे व मंडई किती आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांनाही सांगता आली नाही. मागील अनेक वर्षांपासून गाळेधारक व खोकेधारकांना भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार कसे, असा प्रश्न सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी उपस्थित केला. दोन महापौर, दोन सभागृहनेते बदलले, तरीही हद्दवाढ भागातील अमृत योजनेचे काम अपूर्णच आहे. प्रॉपर्टी चेंबर, मुरूम टाकणे, ड्रेनेजची कामेही तीन वर्षांपासून प्रलंबितच आहेत, असे नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी सांगितले. त्याची कारणे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांना देता आली नाहीत, अशी चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com